Mumbai metro News sakal
मुंबई

Mumbai News: मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला मनपाचा ३७५ कोटींचा कर

कंत्राटदारांनी पालिकेचा ३७५ कोटी १२ लाख ७५ हजारांचा मालमत्ता कर थकवला आहे| The contractors have paid property tax of 375 crore 12 lakh 75 thousand to the municipality

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: शहरात विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. करारानुसार कास्टिंग यार्ड भूखंडाचा मालमत्ताकर भरण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे. मात्र, कंत्राटदारांनी पालिकेचा ३७५ कोटी १२ लाख ७५ हजारांचा मालमत्ता कर थकवला आहे.(mumbai Metro)

याप्रकरणी महापालिकेने मेसर्स एचसीसी-एमएमसी, मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल ॲण्‍ड टी स्‍टेक या कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे.


पालिकेने १९ मार्च २०२४ रोजी या नोटिसा बजावल्या आहेत. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाच्या वतीने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. करनिर्धारण आणि संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यासाठी पाठपुरावा करत आहेत. २८ मार्च २०२४ दुपारी तीन वाजेपर्यंत दोन हजार ३९८ कोटींची करवसुली झाली आहे.(mumbai metro news)

सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांतील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत.

कास्‍टींग यार्ड भूखंडाचा मालमत्ताकर भरण्‍याची करारनाम्‍यानुसार जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर आहे. हा मालमत्ता कर भरण्यात कंत्राटदारांकडून हयगय सुरू असून पालिकेने त्यांच्याविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.(bmc news)

थकीत रक्कम (रुपयांत)
१) मेसर्स एचसीसी-एमएमसी (एफ उत्तर विभाग) : ९८,९२,४१,२४१ रुपये
२) मेसर्स सीईसी-आयटीडी (एफ उत्तर विभाग) : ९५,६०,०७,४४३ रुपये
३) मेसर्स डोगा सोमा (एफ उत्तर विभाग) : ९४,३९,८१,४२१ रुपये
४) मेसर्स एल ॲण्‍ड टी स्‍टेक (एफ उत्तर विभाग) : ८२,१२,८४,७१४ रुपये
५) निर्मल लाईफस्‍टाईल (टी विभाग) : ४०,६५,८३,७८५ रुपये


६) विधी रिॲलिएटर्स (पी उत्तर विभाग) : १६,९५,०८,९१९ रुपये
७) जे कुमार इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा. लि. (पी उत्तर विभाग) : १६,३०,२५,४३२ रुपये
८) रॉयल रिॲलिएटर्स (पी उत्तर विभाग) : ४,४४,४८,१२० रुपये
९) मेसर्स एचसीसी-एमएमसी (एफ उत्तर विभाग) : ४,०७,६३,४१९ रुपये
१०) राधा कन्‍स्‍ट्रक्‍शन (पी उत्तर विभाग) : २,९०,७४,३८७ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT