मुंबई: कोरोनासोबत मुंबईकर व्हायरल फीवरने त्रस्त झाल्याच्या तक्रारी मुंबईतील अनेक भागातून येत आहेत. व्हायरल फिवरसोबत अंगदुखी, डोकेदुखी ही लक्षणे लोकांमध्ये मोठया प्रमाणात दिसत आहे.
सध्या मुंबईकर हाडांचे दुखणे, ताप, खोकला, अशक्तपणा या सर्व आजारांनी वैतागले आहेत. सध्या सगळीकडे कोरोनाचे रुग्ण सापडत असुन दिवसेंदिवस संख्या वाढत आहेत. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातील अनेक खासगी क्लिनिक्स ही बंद आहेत. याचा सर्वात जास्त परिणाम हा मोठ्या रुग्णालयांवर होत आहे. मोठ्या रुग्णालयांवर ताण वाढत असुन नॉन कोविड रुग्णांवर उपचार करुन घेण्यासाठी ही खुप मेहनत घ्यावी लागत आहे.
सध्या वातावरणात ही होणार्या सततच्या बदलामुळे आजारांचं प्रमाण वाढलं आहे. कधी कडक ऊन, कधी मळभ अशा वातावरणाचा अनुभव मुंबईकर घेत आहेत. यामुळे, ताप, डोकेदुखी, खोकला, गळा दुखणे- खवखवणे, उलट्या, जुलाब अशा आजारांनी ही डोकं वर काढलंय. शिवाय, आलेला ताप पाच ते सहा दिवस किंवा जास्तीत जास्त आठवडा भर राहत असल्याच्या तक्रारी सध्या मुंबईकरांमध्ये दिसत आहेत. त्यामुळे, अशा आजारांवर घरगुती उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
१५० पैकी १०० रुग्ण व्हायरल फिवरचे -
वेगवेगळ्या आजारांवरील उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल होणार्या १५० रुग्णांपैकी किमान १०० रुग्ण हे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा या लक्षणांची आढळत असल्याचे जनरल फिजिशियन डॉ. प्रदिप परब यांनी सांगितले.
गेल्या दोन आठवड्यात आलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण ताप आणि अशक्तपणा, खोकला या आजारांचे आढळले आहेत. त्यातले काही कोरोनाचे रुग्ण निघतात. मात्र, चाचणी केली जात नसल्याने कोरोना आहे की नाही हे ही स्पष्ट होत नाही. शिवाय, बाकी आजारांवरील उपचारांसाठी कुठे जावे हा देखील रुग्णांपुढे प्रश्न आहे. पुर्वी जो व्हायरल फिवर असायचा तशीच ही लक्षणे आहेत. मात्र त्यावेळेस एकदा औषध दिली की तो रुग्ण बरा व्हायचा पण आता एक आठवडा ताप राहतो अश्या तक्रारी घेऊन रुग्ण दाखल होत आहेत", असं जनरल फिजिशियन डॉ. प्रदीप परब यांनी म्हंटलंय.
प्लेटलेट्स कमी होण्याच्या ही तक्रारी-
मुंबईतील अनेक रुग्ण ताप, अंगदुखी, थंडी, अशक्तपणा या तक्रारी घेऊन येतात. त्यांना रक्त तपासणी सांगितली जाते. त्या तपासणीचा अहवाल मलेरिया, कावीळ, टायफाईड असा कोणताही आजारा नसल्याचे निदर्शनास येते. मात्र, प्लेटलेट्स कमी झालेल्या असतात. यामुळे, त्यांना कोविड चाचणीचा सल्ला देतो. मात्र, पालिका आणि खासगी रुग्णालयात ही लक्षणे नाहित असे सांगुन चाचणी ही केली जात नाही. संपुर्ण मुंबईत कुठे ही सध्या बेडस उपलब्ध नाहीत. १०० पैकी ८० रुग्ण हे फक्त अश्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामूळे हा कम्युनिटी संसर्ग होऊ शकतो. कदाचित कोरोनाने त्याची लक्षणे बदलली असू शकतात. त्यामूळे या रुग्णांची प्राधान्याने कोविड चाचण्या झाल्या पहिजेत", असं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्ना पालांडे यांनी म्हंटलंय.
viral fever and cough patients are increased in mumbai read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.