corona positive
corona positive 
मुंबई

एका कोरोनाबाधित डॉक्टरामुळे अख्खं गाव हदरलं!, 300 हून अधिक रुग्ण संपर्कात

सकाळवृत्तसेवा

नेरळ : नेरळ गावातील खांडा भागात असलेल्या एका आयुर्वेदिक एमडी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरने 300 हून अधिक रुग्णांना तपासले असून कोणत्याही रुग्णाची नोंद त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ते 300 रुग्ण कोण? यामुळे नेरळकर आणि आजूबाजूच्या गावातील लोक हैराण आहेत. दरम्यान,मुंबईत महिनाभर उपचार करत असलेल्या 7 वर्षीय लहान मुलाचे 14 जून रोजी दुर्दैवी निधन झाले आहे. 

नेरळ गावातील खांडा भागात असलेल्या 47 वर्षीय डॉक्टरकडून ममदापूर येथील गोकुळधाम इमारतीमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची तपासणी केली होती. त्यानंतर आता या डॉक्टरचीही कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पण या डॉक्टरांनी मागील आठ दिवसांत तब्बल 300 हून अधिक किरकोळ आजारावर उपचार घेणाऱ्यांची तपासणी केली आहे. त्यामुळे त्या 300 रुग्णांनाही कोरोना होण्याची शक्यता असल्याने आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुख्य म्हणजे या कोरोनाग्रस्त डॉक्टर यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची नावे कोणत्याही स्वरूपात लिहून ठेवलेली नाहीत अथवा कोणत्याही प्रकारची नोंद नाही. यामुळे नेरळ आणि आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ते निघाले महिन्यापूर्वीचे रुग्ण
त्या डॉक्टरकडून जी 20 नावे प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली आहेत. त्यांना आरोग्य विभागाकडून फोन केले असता, त्या सर्वांनी आपण त्या डॉक्टरांकडे महिन्याभरापूर्वी गेलो असल्याचे उत्तर दिले आहे. त्यामुळे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रही चक्रावून गेले आहेत.

संसर्ग वाढण्याची आरोग्य विभागाला भीती
कोरोनाग्रस्त डॉक्टरमुळे त्यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या रुग्णांना कोरोनाच्या आजाराने ग्रासले, तर मोठे संकट निर्माण होणार आहे. ही बाब नेरळ ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गांभीर्याने घेतली आहे. यासाठी त्या रुग्णांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्या डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे काय होणार? त्यातून कोरोनाचा संसर्ग किती वाढणार? हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

कोल्हारे गावातील बालकाचा मृत्यू
नेरळ गावाजवळील कोल्हारे गावातील सातवर्षीय मुलगा श्वसनाच्या आजाराने गेले महिनाभर मुंबईत हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्याची कोरोना चाचणी केली. 13जूनच्या रात्री त्याचा अहवाल हिंदुजा रुग्णालयाला प्राप्त झाला होता; मात्र काही तासांनी म्हणजेच 14 जूनला त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

the whole village was shaken by a corona positive doctor, in contact with more than 300 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP vs BSP: खेळ राजकारणाचा! भाजप नेत्याच्या लेकाला मायावतींच्या पक्षाचे तिकीट

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

SCROLL FOR NEXT