Nanded Crime News esakal
नांदेड

Nanded Crime : घर बांधकामासाठी माहेरहून पैसे आणले नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विवाहितेचा खून

माहेराहून पैसे आणले नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छातीत चाकूचे वार करून खून केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

माहेराहून बांधकाम करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती.

नांदेड : घराच्या बांधकामासाठी माहेराहून पैसे आणले नसल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छातीत चाकूचे वार करून खून केला आहे. सदरील घटना भोकर येथे रविवारी (ता. चार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

भोकर येथील विवाहिता अश्विनी हिला पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ ही सासरची मंडळी शारीरिक व मानसिक त्रास देत होती. माहेराहून बांधकाम करण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत होती. या भांडणातच तिच्या छातीत चाकूने वार करून तिला ठार मारले आहे.

याबाबत तिचे वडील राजू नारायण गुंडेकर (वय ४५, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलिस ठाण्यात (Bhokar Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार श्रीराम कराड करत आहेत.

बजाजनगरला घरफोडी

नांदेड शहरातील बजाजनगरातील आनंदा सुभाष जोजारे (वय २३) व त्याचे कुटुंबीय घराच्या मागील दारास कुलूप लाऊन छतावर झोपण्यास गेले. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने, कॅमेरा आणि एक मोबाईल असा एकूण ६८ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT