Actor Aamir Khan esakal
पश्चिम महाराष्ट्र

Aamir Khan in Sangli : 'तिळगंगा'बाबत अभिनेता आमिर खाननं घेतला महत्वाचा निर्णय; लवकरच देणार करमाळेला भेट

'अमीर खान व ग्रामप्रकाश संस्था मिळून सोबत काम करतील'

सकाळ डिजिटल टीम

लवकरच स्वतः आमिर खान तिळगंगा नदीच्या खोऱ्याची पाहणी करण्यास गावाला भेट देणार आहेत.

शिराळा : तिळगंगा नदी (Tilganga River) पुनरुज्जीवन संदर्भात करमाळे (ता. शिराळा) येथील सरपंच व ग्रामस्थांनी मुंबई येथे अभिनेते अमीर खान (Aamir Khan) यांची भेट घेतली. खान यांनी करमाळेला लवकरच भेट देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती सरपंच सचिन पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले,‘‘तिळगंगा नदी पुनरुज्जीवन कामात ग्रामप्रकाश संस्थेला (Gram Prakash Sanstha) अमीर खान मदत करणार आहे. आता कामाला गती येणार आहे. लवकरच स्वतः आमिर खान तिळगंगा नदीच्या खोऱ्याची पाहणी करण्यास गावाला भेट देणार आहेत. सत्यजित भटकळ व अमीर खान यांची कन्या व अगत्सु फाउंडेशनच्या अहिरा खान यांच्यासोबत बैठक झाली.

Actor Aamir Khan Karmale Villagers

अमीर खान व ग्रामप्रकाश संस्था मिळून सोबत काम करतील, असे सांगितले. प्रदीप गारोळे (संचालक, पाणलोट विकास व व्यवस्थापन केंद्र, यशदा, पुणे) यांची ग्रामधन (ग्रामकोष) संकल्पना असून ग्रामप्रकाश संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांनी विस्तृत माहिती दिली. करमाळेने ग्रामधन संकल्पनेचा महाराष्ट्रातील पहिला ग्रामसभा ठराव केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या सहसंचालक प्रियांका सकटे यांचीही भेट घेण्यात आली. त्यांनी वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित करमाळेसह इतर गावांच्या सद्यस्थितीची संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आराखडा करण्याच्या सूचना दिल्या. करमाळे हे महावितरणच्या भगीरथ योजनेपासून वंचित असल्यामुळे मुंबई येथे महावितरण व्यवस्थापक अशोक साळुंखे यांची भेट घेतली.

त्यांनी संबंधित विभागांना सूचना करून प्रथम प्राधान्याने प्रश्न सोडविण्यात येईल, असे सांगितले. भारती विद्यापीठ (पुणे) चे प्रकाश संदे, जल व्यवस्थापक तीळगंगा नदी व जलनायक (यशदा, पुणे) चे प्रकाश पाटील, ग्रामसेवक राजेश सूर्यवंशी, विशाल पवार, राकेश माने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT