Farmer killed in sugarcane tractor collision 
पश्चिम महाराष्ट्र

उसाच्या ट्रॅक्‍टरने शेतकऱ्याला चिरडले 

सकाळ वृत्तसेवा

नेवासे : उसाने भरलेला डबल ट्रेलर व ट्रॅक्‍टर अंगावरून गेल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना देवगाव (ता. नेवासे) येथे देवगाव-भेंडे रस्त्यावर शनिवारी (ता. 14) सायंकाळी घडली. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी-अधिकारी जोपर्यंत घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून उचलणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. 

नामदेव बलवंत आगळे (वय 68, रा. आगळे वस्ती, देवगाव, ता. नेवासे) असे अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नामदेव आगळे यांचे देवगाव शिवारात भेंडे-देवगाव मधल्या रस्त्यालगत शेती आहे. सायंकाळी घरी जात असताना आगळे यांना उसाच्या ट्रॅक्‍टरची धडक बसली. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. हेही

अपघाताची माहिती समजताच देवगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी करून डबल ट्रेलर-ट्रॅक्‍टर वाहतूक बंद करा, कारखान्याने ऊस वाहतूक व भेंडे येथे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, "ज्ञानेश्वर'चे संचालक रावसाहेब निकम, प्रशासनाचे प्रतिनिधी बाळासाहेब आरगडे, सुरक्षा अधिकारी सुनील देशमुख यांनी घटनास्थळी येऊन नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर सायंकाळी सात वाजता नामदेव आगळे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेवासे फाटा येथील तालुका ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. 

मृत नामदेव आगळे यांच्या मागे पत्नी, विवाहित दोन मुले, एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. नेवासे डेपोतील एसटी चालक ज्ञानदेव आगळे यांचे ते वडील होत. कुकाणे पोलिस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल संतोष फलके, अमोल बुचकूल यांनी संबंधित ट्रॅक्‍टरचालकासह ट्रॅक्‍टर-ट्रेलर ताब्यात घेतला आहे. नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT