पश्चिम महाराष्ट्र

पाण्यातील जडत्वामुळे या शहरवासियांना गंभीर आजाराची शक्‍यता

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील जडत्वामुळे गर्भवती महिलांवर परिणाम होण्यासह कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सोलापूरकरांना सामोरे जाण्याची शक्‍यता आहे. या संदर्भातील सविस्तर चर्चा मुंबईतल्या बैठकीत झाली. त्याची गांभीर्याने दखल घेत जडत्व तपासणी केंद्र सोलापुरात सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 

उजनीच्या पाण्याच्या शुद्धीकरणात गोंधळ
उजनी जलाशयातील पाणी यशवंत जलवाहिनी योजनेद्वारे सोलापूर शहरात आणले आहे. त्याच्या शुद्धीकरणातील गोंधळ असल्याचे काही वर्षांपूर्वी कॉलऱ्याच्या साथीने सिद्ध केला आहे. सोलापूर जिल्ह्यात मुतखड्याचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळतात. त्याचप्रमाणे किडनी आणि  पोटाचे विकार असलेले रूग्णही खूप आहेत. पाण्यामुळे अंगावर पुरळ उठण्यासारखे त्वचाविकारही वाढू शकतात. उजनी धरण परिसरातील गावात असे रूग्ण खूप आहेत. अपचन, गॅसेस, आमांश, उलटी, जुलाब, खोकला, पोटदुखी या विकाराचे अनेक रूग्ण आहेत. सरकारी यंत्रणा उदासीन, प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनास्था, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष अशा वाईट स्थितीत उजनी धरण आणि भीमा नदीवर अवलंबून असलेल्या शहरे सापडली आहेत. 

सर्वाधिक धोका सोलापूर जिल्ह्याला
उजनीच्या दुषित पाण्याच्या सर्वांधिक धोका सोलापूर जिल्ह्याला आहे. पण, अद्याप प्रदूषणाच्या विरोधात जनतेमध्ये संपूर्ण जागरुकता आली नाही. 
राज्यातील सर्वांधिक प्रदूषित पाच नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे उजनी धरणातील पाणी झपाट्याने प्रदूषित होत आहे. प्रदूषणामुळे पाण्यातून कारंजे उडणे, मासे मरण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जडत्वाचे प्रमाण तपासणी केंद्राची उभारणी झाल्यास पाण्यामध्ये काही  प्रमाणात सुधारणा होण्याची शक्‍यता आहे. शहराला होणारा दूषित पाणीपुरवठा आणि उजनी धरणातील दूषित पाणी या संदर्भात "सकाळ'ने वारंवार आवाज उठविला आहे. या प्रकल्पामुळे ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. 

महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प
दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा झाल्यास तो महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे. यावेळी पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि सुधारणा याबाबतही चर्चा झाली. सध्याच्या पाण्यामुळे गर्भवती महिला, नवजात शिशूंना त्रास होऊ शकतो. याशिवाय कर्करोगाचीही भीती आहे. जडत्व तपासणी केंद्र उभारल्यास त्याचा फायदा सोलापूरला होईल. 
- दीपक तावरे, आयुक्त, सोलापूर महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT