पश्चिम महाराष्ट्र

निपाणीत 'चहा'ची आगळीच 'क्रेझ'! फर्निचरवर लाखोंची गुंतवणूक

- राजेंद्र हजारे

हा व्यवसाय टिकवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असून 'चहापेक्षा किटली गरम' असाच हा प्रकार दिसून येत आहे.

निपाणी (बेळगाव): चहाला इंग्रजांनी भारतात आणले. १९४७ मध्ये ते देश सोडूनही गेले, पण भारतीयांनी चहाला सोडले नाही. आता तर निपाणी शहरात चहाची आगळीच 'क्रेझ' निर्माण झाली आहे. बाहेरील चहाच्या हॉटेल कंपन्यांनी या व्यवसायासाठी लाखो रुपयांच्या फर्निचरची गुंतवणूक केली आहे. हा व्यवसाय टिकवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू असून 'चहापेक्षा किटली गरम' असाच हा प्रकार दिसून येत आहे.

पाणी, चहा पावडर, साखर, दुधाचे उकळलेले मिश्रण ही चहाची साधी सोपी व्याख्या आहे. पण चहाच्या पर्यायाचे एवढे मिश्रण सुरु आहे, की पिणाऱ्याला कोणता चहा निवडावा हेच कळेनासे झाले आहे. निपाणी शहरात चहा प्यायला गेले की चहावाला चहाचे आणखी पर्याय समोर ठेवतो. त्यामुळे ऐकणारा संभ्रमात पडतो. इतर शहर, ग्रामीण भागात चहावाले आहेत. मात्र निपाणीतील चहावाल्यांची गोष्टच वेगळी आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील ठराविक चौकात हॉटेल, टपरीवजा हातगाड्यांवर चहा मिळतं. त्यावेळी हा छोटेखानी व्यवसाय होता. आता चहा हा चक्क 'बिझनेस' बनला आहे. भाडेतत्त्वावरील गाळ्यांमध्ये आलिशान फर्निचर करून वेगवेगळा चहा निपाणी शहरात विकला जात असून पिणारेही आवडीने पित आहेत. शहराच्या प्रवेशद्वारपासूनच विविध मार्गावर चहाच्या पाट्या सुरू होतात. चहाच्या दुकानांची नावे वेगवेगळी असली तरी प्रत्येक पाटीवर चहासोबत 'अमृततुल्य' हमखास जोडलेले दिसते.

५ ते ५० रुपयांपर्यंत कप

चहाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या किंमती आहेत. साधा चहा पाच रुपयांना तर स्पेशल दहा रुपयाला सर्वत्र मिळतो. मात्र अफलातून चहासह ग्रीन, मिल्क, लेमन अशा वेगवेगळ्या चहाच्या कपची किंमत पन्नास रुपयांपर्यंत आहे.

निपाणीत मिळणारा चहा

- साधा चहा

- स्पेशल चहा

- ब्लॅक टी

- जिंजर टी

- ग्रीन टी

- मिल्क टी

- लेमन टी

- बासुंदी चहा

- शुगर फ्री चहा

'अलीकडच्या काळात स्वच्छता महत्वाची आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन फर्निचर व इतर साहित्यावर मोठा खर्च करावा लागला आहे. त्यामानाने दुकानांची संख्याही मोठी झाली आहे. परिणामी कसरत करत चहाचे हॉटेल चालवावे लागत आहे.'

- आदर्श कागले, चहा हॉटेल चालक, निपाणी

निपाणीतील चहावर दृष्टिक्षेपात...

- बाहेरील कंपन्यांची चहाची हॉटेल : १३

- स्थानिक लहान-मोठी हॉटेल : ४०

- चहाच्या टपऱ्या : ७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT