Crime News esakal
कोल्हापूर

Belgaum Crime : पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून केला खून; भांडणातून उचललं टोकाचं पाऊल

काकाला दोन बायका असून त्यांना मुले नसल्याने पुतण्याला दत्तक घेतले होते.

सकाळ डिजिटल टीम

लक्ष्मणच्या दुसऱ्या पत्नीशी मलाप्पा यांचा खटला सुरू होता. त्या खटल्यात तडजोड साडेसहा लाखात झाली होती.

रायबाग : हारूगेरी इथं बुधवारी सकाळी साडेनऊचा सुमारास पतीने पत्नीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. रुक्मव्वा मलाप्पा उप्पार (वय ३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. किरकोळ वादातून हा थरार घडला आहे.

याबाबत हारूगेरी पोलिसांनी (Harugeri Police) दिलेली माहिती अशी, हारूगेरी येथील ईदगाहजवळ उप्पार परिवारासह राहत होता. मल्लाप्पा उप्पार हा काका लक्ष्मण यांना दत्तक गेला होता. काकाला दोन बायका असून त्यांना मुले नसल्याने पुतण्याला दत्तक घेतले होते.

१३ गुंठे जमिनीचा दावा न्यायालयात चालू होता. लक्ष्मणच्या दुसऱ्या पत्नीशी मलाप्पा यांचा खटला सुरू होता. त्या खटल्यात तडजोड साडेसहा लाखात झाली होती. ती रक्क्म मल्लाप्पाने देऊ नये, म्हणून घरात रोज पती- पत्नीत भांडण होत होते.

बुधवारी सकाळी पत्नीला मल्लाप्पाने उठवले, ती उठली नाही. मुलांना शाळेला सोडून येऊन पुन्हा उठवण्याचा प्रयत्न मल्लाप्पाने केला पण पत्नी रागावल्याने मल्लाप्पा घराबाहेर जाऊन बसला. हारूगेरी पोलिसांना याची माहिती मिळताच मलाप्पाचा शोध घेण्यास सुरू केला. त्याला गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशी केली असता सर्व माहिती पोलिसांना दिली. मल्लाप्पा याला दोन मुले असून हारूगेरी पोलिस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. गुरुवारी जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील, अथणीचे डीएसपी श्रीपाद जलदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी हारूगेरीचे पोलिस निरीक्षक रवींचंद्र एफ. व उपनिरीक्षक गिरीमाल उप्पारसह उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT