Scientist Kerba Lohar India Moon Mission Chandrayaan-3 esakal
कोल्हापूर

Chandrayaan-3 मोहीम फत्ते! आडीच्या सुपुत्रानं देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा; शास्त्रज्ञ लोहार यांना दुसऱ्यांदा संधी

भारताचे ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan-3) हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी (ता. १४) दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले.

राजेंद्र हजारे

भारताची चांद्रयान- ३ (ISRO) ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

निपाणी : श्रीहरीकोटा येथे भारताचे ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan-3) हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी (ता. १४) दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले. या महत्त्वाकांक्षी मोहिमेत निपाणी तालुक्यातील आडी येथील केरबा लोहार (Scientist Kerba Lohar) या अभियंत्याचा समावेश होता.

आडीसारख्या (Adi Village) ग्रामीण भागात केरबा यांचे शिक्षण झाले. पाच वर्षांपूर्वी ते इस्रोत दाखल झाले. यापूर्वी चांद्रयान-२ या मोहिमेत (India Moon Mission Chandrayaan-3) त्यांनी सहभाग दर्शविला होता. पण हे उड्डाण यशस्वी होऊ शकले नाही. त्यानंतर पुन्हा सलग तीन वर्षे सहकाऱ्यांसमवेत अथक परिश्रम घेऊन चांद्रयान-३ मोहीम साकारली.

इस्रोच्या शास्त्रज्ञांसह (ISRO Scientist) भारतीयांनी विजयी जल्लोष केला. लोहार म्हणाले की, भारताची चांद्रयान- ३ (ISRO) ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताने तब्बल ६१५ कोटी रुपये खर्च केले आहेत. चांद्रयान-३ अंतराळयान २३ अथवा २४ ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे.

चांद्रयान-३ ने ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. चांद्रयान-३ तीन लाख ८४ हजार किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणे हे चांद्रयान-३ मोहिमेचे पहिले लक्ष्य आहे.

रॉकेटचा वेग ताशी ७ हजार किलोमीटर

चांद्रयान-३ चे वातावरणापासून संरक्षण करणारी हीट शील्ड सुमारे ९२ किमी उंचीवर रॉकेटपासून वेगळी होईल. ११५ किमी अंतरावर चांद्रयानाचे इंजिन वेगळे होऊन क्रायोजेनिक इंजिन कार्य करण्यास सुरुवात करेल. क्रायोजेनिक इंजिन चांद्रयानाला १७९ किमी अंतरापर्यंत घेऊन जाईल. तेव्हा त्याचा वेग ३६९६८ किमी प्रति तास असेल.

प्रक्षेपणाच्या १०८ सेकंदांनंतर रॉकेटचे द्रव इंजिन ४५ किमी उंचीवर सुरू होईल. त्यावेळी रॉकेटचा वेग ताशी ६४३७ किमी असेल. आकाशात ६२ किमी उंचीवर गेल्यावर दोन्ही बूस्टर रॉकेटपासून वेगळे होऊन रॉकेटचा वेग ताशी ७ हजार किमी होईल, असेही लोहार यांनी सांगितले.

खानापूरच्या मराठमोळ्या सुपुत्राचे योगदान

खानापूर : देशाच्या इतिहासात शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावले. हा देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे.

या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा हातभार लागला आहे. चांद्रयान २ च्या मिशनमध्येही प्रकाश पेडणेकर यांचा सहभाग होता. श्री. पेडणेकर अनगडीचे. चांद्रयान -२ च्या मिशनमध्ये त्यांना संधी मिळाली होती.

संधीचं सोनं करीत त्यांनी पुन्हा यावेळीही चांद्रयान- ३ च्या मिशनसाठी अस्तित्व निश्चित केले होते. चांद्रयान- २ चे मिशन तांत्रिक बिघाडामुळे अपयशी ठरले. पण, यावेळी हे मिशन फत्ते करायचेच, या जिद्दीने इस्त्रोचे वैज्ञानिक झपाटून कामाला लागले होते. त्यात प्रकाश यांचाही सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना मोठा झटका, सिलिंडरच्या किमतीत वाढ

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT