Kolhapur
Kolhapur sakal
कोल्हापूर

Kolhapur : इचलकरंजीला तालुका निर्मितीचे वेध; नजीकच्या काळात निर्णयाची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

इचलकरंजी - इचलकरंजीसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानंतर आता इचलकरंजी स्वतंत्र तालुका होण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुका निर्मितीच्या हालचाली शासन पातळीवर सुरू झाल्या आहेत.

यामध्ये पहिल्या टप्प्यात सात ते आठ नवीन तालुके अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. यामध्ये इचलकरंजीचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे इचलकरंजी तालुका करण्यासाठी आवश्यक सर्व परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे हातकणंगले तालुक्याचे विभाजन होऊन इचलकरंजी हा नवीन तालुका निर्माण होण्याची मागणी नजीकच्या काळात पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोल्हापूरनंतर इचलकरंजी सर्वात मोठे शहर आहे. दहा महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे महापालिका झाली. त्यामुळे इचलकरंजीला महापालिकेचे शहर म्हणून नवी ओळख मिळाली. आता प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित राहिलेल्या स्वतंत्र आरटीओ कार्यालयास मंजुरी मिळाली. `एमएच ५१` अशी आणखी एक नवी ओळख इचलकरंजीला आता मिळाली आहे. यापुढे आता नविन काय मिळणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

यामध्ये इचलकरंजी नवीन तालुका होणार असल्याच्या चर्चेने गती घेतली आहे. त्यानुसार शासन पातळीवर हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये विस्ताराने मोठ्या असलेल्या तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुका निर्मिती करण्यावर शासनाचा भर आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्याचे विभाजन करुन इचलकरंजी हा स्वतंत्र तालुका करण्याच्या प्रक्रियेला गती येत आहे. नजीकच्या काळात इचलकरंजीला आणखी एक नवी ओळख मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुळात ही मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. इचलकरंजी शहरात बहुतांशी शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे तालुक्याचे ६० टक्केपेक्षा जास्त काम इचलकरंजीतूनच चालते. हातकणंगले तालुक्याचा भौगोलिक आकार खूपच मोठा आहे. पंचगंगा नदी पलीकडील गावांना हातकणंगले तालुक्याचे ठिकाणा दळणवळणाच्या दृष्टीने गैरसोयीचे आहे. त्यामुळे इचलकरंजी स्वतंत्र तालुका करण्याची मागणी गेल्या वीस वर्षांपासून होत आहे.

तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर आमदार प्रकाश आवाडे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेवून इचलकरंजीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयाच्या मंजुरीनंतर त्यांची मागणी दृष्टिपथात असल्याची संकेत मिळत आहेत.

हातकणंगले तालुका क्षेत्र दृष्टिक्षेप

लोकसंख्या ८ लाख

एकूण गावे ६२

महापालिका १

नगरपालिका २

नगर पंचायत १

विधानसभा मतदार संघ २

इचलकरंजीतील शासकीय आस्थापना

प्रांत कार्यालय

अपर तहसील कार्यालय

मंडल कार्यालय

तलाठी कार्यालय

अपर पोलिस अधीक्षक कार्यालय

पोलिस उपअधिक्षक कार्यालय

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय

पासपोर्ट कार्यालय

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT