Kolhapur Crime News
Kolhapur Crime News Esakal
कोल्हापूर

Kolhapur Crime News: कोल्हापुरात टोळीयुद्धाचा भडका! तरुणावर अंदाधुंद गोळीबारासह धारदार शस्त्राने वार

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोल्हापूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूरच्या जवाहरनगर परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. टोळीयुद्धातून जवाहर नगरातील यादव कॉलनीमधील सरनाईक वसाहतीमध्ये काल रात्री ११ वाजता गोळीबार झाला. यामध्ये साद शौकत मुजावर (वय २३) हा गंभीर जखमी झाला.

त्याच्या मांडीत गोळी लागली आहे तसेच डोक्यावरही वार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, साद मुजावर हा वाहने आणि जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. रात्री अकराच्या सुमारास तो त्याच्या मित्रांसोबत घराजवळील कट्ट्यावर बसला होता. तेवढ्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनातून पाच ते सहा तरुण तेथे आले. त्यांनी पिस्तूल साद याच्या दिशेने रोखून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या मांडीत घुसली; तर दोन गोळ्या हवेत गेल्या.

यानंतर संशयितांपैकी दोघांनी त्याच्या डोक्यावर धारदार शास्त्राने वार केले. दरम्यान, परिसरातील लोक तेथे येताना दिसताच तरुणांनी वाहनांतून पळ काढला. जखमी सादला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये आणले. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी भेट दिली. यावेळी दोन पुंगळ्या हस्तगत केल्या गेल्या.

घटनेची माहिती कळताच परिसरातील तरुण सीपीआरमध्ये पोहोचले. पोलिसांनी या गर्दीला पांगवले. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू आहे. अशावेळी घडलेल्या या गोळीबाराच्या प्रकारामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे.

पाच संशयितांची नावे समोर

साद याचे वडील शौकतअली मुजावर यांनी पाच संशोधकांची नावे सांगितली आहेत. यामध्ये सद्दाम मुल्ला, इमाम हुसेन कुरणे, माजी नगरसेवक सत्तार मुल्ला, मोहसीन मुल्ला, तौहिक कुरणे अशी त्यांची नावे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT