कोल्हापूर : जिल्हा बॅंकेची मी निवडणूक लढवणार पण अध्यक्ष होणार नाही, अशी घोषणा बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीचा सर्वाधिक फटका हा जिल्हा बॅंकांना त्यातही आमच्या बॅंकेला तो जास्त बसल्याचेही श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले.
जिल्हा बॅंकेच्या मोबाईल बॅंकिंग सुविधेसह बॅंकेच्या वेबसाईटचे अनावरण नाबार्डचे अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. मुश्रीफ बोलत होते.
यापुर्वी बॅंकेच्या एका सेवेचा शुभारंभ डॉ. थोरात यांच्या हस्ते झाले, त्यांचा हात लागला की बॅंकेचे चित्रच बदलून गेले असे सांगून श्री. मुश्रीफ म्हणाले, "नोटबंदीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांकडील जुन्या नोटा स्विकारल्या नाहीत. नोटा बदलून देण्याचा अधिकार इतर बॅंकांना दिला पण त्यातही जिल्हा बॅंकांना सामावून घेतले नाही. या अन्यायाचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅंकांना आणि पर्यायाने शेतकऱ्यांना बसला आहे.'
नोटबंदीचा सर्वाधिक फटका जिल्हा बॅंकांना
ते म्हणाले,"जिल्हा बॅंकेचा शेतकरी हाच ग्राहक, त्यामुळे बॅंकेत जाऊनच पैसे काढायची हीच शेतकऱ्यांची मानसिकता होती. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान आणले त्या माध्यमातून बॅंकांच्या सेवा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचल्या. "दत्त-आसुर्ले' कारखान्याचे कर्ज थकित नसताना हा कारखाना अवसायानात काढला आणि त्यातून बॅंकेच्या कारभाराला गालबोट लागले.'
ते म्हणाले,"दरवर्षी 35 कोटी रूपयांचा तोटा सहन करून बॅंक शेतीसाठी एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के दराने तर दोन लाखापर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने देते. ही वस्तुस्थिती असताना जिल्ह्यातील 80 टक्के ठेवी ह्या व्यापारी बॅंकांत ठेवल्या जातात याची खंत वाटते. यापुढे बॅंकेच्या प्रवाहात सर्वच ग्राहकांना आणण्याची जबाबदारी संचालक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची राहील.'
थोरांताकडून मुश्रीफांचे कौतुक
मी बॅंकेचा अध्यक्ष नसेल या श्री. मुश्रीफ यांच्या वक्तव्याची दखल घेऊन डॉ. थोरात म्हणाले,"बॅंकेच्या राजकारणाशी मला देणे-घेणे नाही. पण गेल्या पाच वर्षात बॅंकेत अतिशय चांगले काम झाले आहे. श्री. मुश्रीफ उभे राहतील, पडतील अध्यक्ष होतील का नाही हे माहित नाही पण त्यांचे आताचे काम हे त्यांचे जाहीरपणे आभार मानावेत असे आहे आणि ते भावी पिढ्यांना कल्याणाचे आहे एवढे नक्की.'
फडणवीसांनी तिथेच रहावे
आज कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी देश आणि महाराष्ट्र सामना करत असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राजकारण सुरू आहे. त्यांचा "सागर' बंगला हा राज्यपालांच्या बंगल्याशेजारीच आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीवरून उठसुठ राज्यपालांची भेट घेणाऱ्या श्री. फडणवीस यांनी तिथेच जाऊन रहावे, असा टोला श्री. मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.
त्याविषयी घरी जाऊन बोलेन
नाबार्ड आणि रिझर्व्ह बॅंकेकडून जिल्हा बॅंकांवर प्रचंड अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमात श्री. मुश्रीफ यांनी जाता या दोन्ही संस्थांविषयी डॉ. थोरात यांच्या घरी जाऊनच बोलेन असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.