Pandharpur-NCP-Bharat-Bhalake
Pandharpur-NCP-Bharat-Bhalake 
पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर : भारतनानांची 'हॅट्ट्रिक'; पंढरपूर-मंगळवेढ्यावर राष्ट्रवादीचा झेंडा! Election Result 2019

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार भारत भालके यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांचा 13 हजार 568 मतांनी पराभव करत हॅट्ट्रिक केल्याने संपूर्ण तालुक्यात फटाक्यांची आतषबाजीसह कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा समावेश असलेल्या मतदारसंघांमध्ये दोन लाख 37 हजार 622 इतके मतदान झाले होते. प्रचारा दरम्यान आमदार भालकेंनी मंगळवेढ्याची मतमोजणी न करता पंढरपूरच्या मतमोजणीवर निकाल घोषित करा, असा विश्वास व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत पंढरपूर तालुक्यात एक लाख 13 हजार 304 इतके मतदान झाले होते, त्यामध्ये त्यांनी पाच हजारपेक्षा अधिक मतांनी घेतले होते. त्यानंतर मंगळवेढा तालुक्यातही मताधिक्य वाढते राहिले.

चोविस फेऱ्यांमध्ये भारत भालकेंनी 89191 इतकी मते मिळाली असून महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना 75623 इतकी मते मिळाली. अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांना 53648, तर काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे 7202 आणि संतोष माने 3937, वंचित बहुजन आघाडीचे दत्तात्रय खडतरेंना 1848 मते मिळाली आहेत. 633 जणांनी नोटाचा पर्याय निवडला.

आमदार भालकेंची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू होताच मंगळवेढ्यातील त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जल्लोषाला सुरवात झाली. ग्रामीण भागातील त्यांचे समर्थक शहरामध्ये दाखल होत असून भालके समर्थकांनी दिवाळीपूर्वी हॅट्ट्रिकने आपली दिवाळी साजरी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT