कोपर्डे हवेली प्रामाणिक तरुण
कोपर्डे हवेली प्रामाणिक तरुण 
पश्चिम महाराष्ट्र

आजही प्रामाणिकपणा टिकून आहे; पाकीट परत केले

जयंत पाटील

कोपर्डे हवेली : 'काळ बदलालाय… आता कोण प्रामाणिक राहिलंय?' असा सूर अनेकवेळा ऐकायला मिळतो. परंतु, आजच्या जमान्यातही प्रामाणिकपणा, माणुसकी टिकून आहे. याची प्रचिती देणारे उदाहरण कोपर्डे हवेलीतील तरुणाच्या कृत्यातून समोर आले आहे. पैशांनी भरलेले पाकीट प्रामाणिकपणा दाखवत त्या पाकिटाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन परत केले. 

महादेव शंकर चव्हाण यांचे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी जनरल स्टोअर्स आहे. दुपारी दुकान बंद करतेवेळी त्यांना काउंटरवर एक पैशांचे पाकीट आढळून आले. त्यावेळी दुकानात एकही गिऱ्हाईक नव्हते. पाकीट उचलून पाहिले असता त्यात जवळपास १६ हजार रुपये, तीन एटीएम कार्ड पिन नंबर सहित आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. मिळालेल्या पैशांचा मोह न ठेवता त्यांनी पाकिटात कोणाचा पत्ता सापडतो का याचा तपास केला, त्यात त्यांना आधार कार्ड व मतदान कार्ड सापडले. त्यावरून हे पाकीट गावातीलच अजित चव्हाण यांचे असल्याची त्यांची खात्री झाली. त्यावर त्यांनी अजित चव्हाण यांची माहिती काढून त्यांना संपर्क केला व तुमचे काही हरवले आहे का? असे विचारले असता, त्याने हो माझे पैशाचे पाकीट हरवले आहे’ अशी माहिती दिली. त्यांने सांगितलेली माहिती बरोबर असल्याने अजित चव्हाण यांना बोलावून ते पाकीट सुपूर्त केले. 

महादेव चव्हाण यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ओम साई ग्रुपमधील मुलांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संदिप चव्हाण, अमोल पाटील, शुभम चव्हाण, अमोल चव्हाण, अभिजित पाटील, दत्तात्रय चव्हाण, अजित चव्हाण, प्रविण चव्हाण, विशाल तुपे, विनोद चव्हाण, बापू पवार आदि उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT