पश्चिम महाराष्ट्र

NEW YEAR SPECIAL : त्यांची नावे सांगा... पत्ते नका सांगू...

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : संसद आणि विधीमंडळाच्या कामकाजावेळी चर्चेदरम्यान काही विनोदी किस्सेही घडतात, त्यातून विनोदाची निर्मिती होते. अशाच काही किश्श्यांचा गुलदस्ता आज (मंगळवार) नवीन वर्षानिमित्त ई सकाळच्या वाचकांसाठी.

संसद, विधीमंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभेत चर्चेवेळी आरोप-प्रत्यारोपावेळी वातावरण तंग होते. अशावेळी सभागृतील सभापती किंवा हजरजबाबीपणा व विनोदबुद्धी असलेल्या काही सदस्यांमुळे हे वातावरण हलकेफुलके होते. त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे सभागृहातील तणाव नाहीसा होतो. उत्स्फुर्त विनोदामुळे सभागृहात हास्याची हर उमटते. मग सर्व पक्षांचे सदस्य त्यात सामील होतात. असेच काही हजरजबाबीपणा व विनोदाच्या प्रसंगाचा आनंद आपण घेऊयात. 

तुमच्या 'च' चा हट्ट सोडा
संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी तत्कालीन विरोधी पक्षाची आग्रही मागणी होती. त्याचा संदर्भ देत तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सभागृहात म्हणाले, संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही मागणी ठिक आहे. मात्र झालाच पाहिजे  हे योग्य नाही. त्यामुळे हा 'च' चा आग्रह तुम्ही सोडा. हे एेकताच आचार्य अत्रे उभे राहिले व म्हणाले, मग तुमच्या चव्हाण मधील 'च' काढून टाका, मग काय राहते ते पहा, हे चालेल का तुम्हाला... हे एेकताच सभागृहात एकच हंशा पिकला.

ते कोणालाही शक्य नाही
राज्यसभेत प्रश्नोत्तरे सुरु होती. उषा मल्होत्रा व मार्गारेट अल्वा यांच्यात शाब्दीक चकमक सुरू होती. त्याचवेळी सभापतींनी खासदार भंडारे यांना प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यावेळी भंडारे म्हणाले, दोन स्त्रिया भांडत असताना मला प्रश्न विचारणे शक्य नाही. त्यावर सभापती म्हणाले, अगदी बरोबर, ते कोणालाही शक्य नाही. हे एकल्यावर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला आणि मल्होत्रा व अल्वा यांच्यातील बाचाबाचीही थांबली हे सांगायला नकोच.

एकूण किती आसने दाखवली आहेत?
'योगासनाच्या शिक्षणाचे प्रसारकार्य' या विषयावरील मार्गदर्शनासाठी तयार केलेल्या पुस्तकासंदर्भात केशवराव धोंडगे यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले,
"यात कोणकोणत्या आसनांचा उल्लेख आहे? कोणकोणती आसने दाखविण्यात आली आहेत?" त्यावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "यात सगळी आसने दाखवली आहेत." धोंडगे पुन्हा म्हणाले, "एकूण किती आसने दाखवली आहेत?त्यावर, "याची माहिती माझ्याकडे नाही", असे उत्तर श्री. शिंदे यांनी दिले. त्यावर, "कोणकोणती आसने दाखवली आहेत, याची माहिती राज्यमंत्र्यांना असणे आवश्यक आहे ना ", अशी विचारणा श्री. धोंडगे यांनी केली. त्यावेळी, "त्यात सर्वांग आसने आहेत याची खात्री बाळगा", असे उत्तर सभापतींनी दिले. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला. 

त्यांची नावे सांगा, पत्ते सांगू नका
महाराष्ट्रात तमाशा या लोककलेचा प्रसार होण्यासाठी तसेच उच्चभ्रू लोकांनासुद्धा पहाता यावा यासाठी शासनातर्फे पंचतारांकित हॅाटेलमध्ये तमाशाचे आयोजन करण्यात आले.  कलावंतांना पैसे देऊन आपल्या आवडीचे गाणे अथवा नृत्य करण्यास सांगण्याची प्रथा आहे. या संदर्भात प्रमोद नवलकर यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "या कार्यक्रमात पैशाचे वाटप झाले का?". त्यावर, ते नृत्यकलावंतावर अवलंबून आहे, असे सभापतींनी सांगितले. त्याचवेळी श्रीमती रांगणेकर यांनी तमाशा कलावंताची यादी शासनाकडे आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी नामदार सुशीलकुमार शिंदे यांनी नावे वाचण्यास सुरवात केली, त्यांना थांबवून अध्यक्ष म्हणाले, "माननीय मंत्री महोदयांनी कलावंतांची फक्त नावे सांगावीत, त्यांचे पत्ते सांगू नयेत." हे एेकताच सभागृहात एकच हंशा पिकला. 

संदर्भ : माननीय अध्यक्ष महोदय 
लेखक : श्री. लक्ष्मणराव लटके व श्री. रणजीत चव्हाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT