निपाणी - सौंदत्ती रेणुका देवीच्या यात्रेस शुक्रवारी (ता. १० )प्रारंभ झाला असून ही यात्रा शनिवार (ता. 22 फेब्रुवारी ) अखेर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारातून 700 बसेसचे नियोजन केले आहे. सोमवारपर्यंत (ता. 27) सौंदत्ती यात्रेसाठी महाराष्ट्रातील विविध गावातून 25 बसचे आरक्षण करण्यात आले आहे. त्यादृष्टीने निपाणी आगार सज्ज असून भाविकांना यंदा सुस्थितीतील नवीन बसेस दिल्या जाणार आहेत.
हे पण वाचा - अरे बापरे; एका हाताने तो उचलतो तब्बल 103 किलोचा दगड
यंदा 37 रुपये प्रतिकिलो मीटर असा दर आकारला जात आहे. कर्नाटक बसची आसन क्षमता 48, 50, 52 अशी असल्यामुळे महाराष्ट्रातून सौंदत्ती यात्रेसाठी मागणी वाढली आहे. प्रतिवर्षी सौंदत्ती यात्रेत कर्नाटकासह महाराष्ट्रातील खेडेगावातून चांगली मागणी असते. त्यामुळे हुबळी परिवहन विभागाला चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे आगार म्हणून निपाणीचा उल्लेख केला जातो. त्यादृष्टीने भाविकांना यंदा चांगल्या सुविधा मिळणार आहेत. यात्राकाळात भाविकांना जलद व तातडीची सेवा मिळावी, यासाठी निपाणी, यरगट्टी, रामदुर्ग, सौंदत्ती येथे तांत्रिक दुरुस्ती विभाग सुरु केले आहेत. त्यामुळे यात्रेत भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही. तसेच सर्व बसेसना कॅरेजची व्यवस्था असल्यामुळे भाविकांची चांगली सोय होत आहे. गतवर्षी सौंदत्ती यात्रेतून निपाणी आगाराला 1.50 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. यंदा आगाराने 2 कोटीचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने आगारातील कर्मचारी व अधिकारी प्रयत्नशील आहेत.
यंदा सौंदत्ती यात्रेतील भाविकांना प्रतिवर्षापेक्षा चांगली सुविधा मिळणार आहे. सर्व बसेसना कॅरेज बसविल्याने भाविकांची सोय होणार आहे. यात्रेसाठी बस आरक्षणास प्रारंभ झाला आहे.
-मंजुनाथ हडपद, व्यवस्थापक, निपाणी आगार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.