पश्चिम महाराष्ट्र

लाख रुपये दे नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारून टाकू;अंगणवाडी सेविकेस धमकी अन्...

सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर (जि. सातारा)  ः एक लाख रुपयांची खंडणी दे, नाहीतर तुझ्या नवऱ्याला ठार मारीन, अशी अंगणवाडी सेविकेला धमकी देणाऱ्या तीन खंडणीबहाद्दरांना कोयना पोलिसांनी शिताफीने अटक केली. देवानंद वाईकर (वय 20) व युवराज जाधव (वय 21, दोघेही रा. येराड) व राहुल देसाई (वय 31, रा. येराडवाडी-मल्हारपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ः कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावर कोयना विभागातील अंगणवाडी सेविकेला शुक्रवारी (ता. 31) दुपारी अज्ञाताने मोबाईलवरून फोन केला. "आम्हाला एक लाख रुपये दिले नाहीतर तुझ्या नवऱ्याला मारून टाकू,' अशी धमकी त्याने त्यांना दिली. त्यामुळे घाबरलेल्या अंगणवाडी सेविकेने घटनेची फिर्याद कोयना पोलिसांत दाखल केली.

पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगवान फिरवली. ज्या मोबाईल नंबरवरून फोन आला होता, त्या मोबाईल नंबरचा सीडीआर तपासून गुन्ह्यातील संशयितांचा पोलिसांनी माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नंबर बंद ठेवल्याने तपासात अडचणी येत होत्या. एक फेब्रुवारीला दुपारी चार वाजता पुन्हा अंगणवाडी सेविकेला फोन करून पाटण बस स्थानकावर खंडणीतील पैसे आणून देण्यास सांगण्यात आले. पाटण बस स्थानकावर पोलिसांनी सापळा रचला. मात्र, या ठिकाणाहून पैसे नेण्यास कोणी आले नाही. त्यानंतर या सेविकेला पुन्हा फोन करून मणदुरे फाट्यावर पैसे घेऊन बोलावले. या ठिकाणी साध्या वेषात पोलिसांनी सापळा रचला. मणदुरे फाट्यावर अंगणवाडी सेविकेकडून पैसे घेण्यासाठी देवानंद वाईकर हा त्या ठिकाणी आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी करताना राहुल देसाई व युवराज जाधव यांचाही सहभाग असल्याचे उघड झाले. या तीनही खंडणीबहाद्दरांना पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. भावीकट्टी तपास करत आहेत.

हेही वाचा -  Video पहा : डॅशिंग उदयनराजेंचं हळवं रुप!


जरुर वाचा - मंत्री,खासदारांच्या मागे-पुढे करत ते लाटत असत लाखाे रुपये - 


हेही वाचा -  धक्कादायक...बालिका बादलीत बुडाली

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I : गौतम गंभीर चूक सुधारणार, Vaibhav Sooryavanshi ला संधी देणार! इंग्लंडविरुद्ध तगडी प्लेइंग इलेव्हन...

Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Latest Marathi News Live Update : पुण्यात गव्यामुळे एकच खळबळ! कॅनलमध्ये अडकलेल्या गव्याला वाचवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

Kolhapur BJP Corporator : कोल्हापुरात राजकीय भूकंप? भाजपच्या रिंकू देसाईंचे नगरसेवकपद धोक्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ; नेमकं काय घडलं?

Railway: मध्य रेल्वेकडून दिलासा! विठुरायाच्या दर्शनासाठी ५४ विशेष गाड्या; तिकीट बुकिंग कधीपासून सुरू होणार? तारीख समोर, पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT