पश्चिम महाराष्ट्र

तुम्ही केस, दाढी, फेशियल करण्यासाठी जात असाल तर हे नक्की वाचा

सकाळ वृत्तसेवा

सातारा : केश कर्तनालय व ब्युटी पार्लर दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. नाभिक दुकाने व ब्युटी पार्लरमध्ये सेवा घेणारी व्यक्ती मास्क लावू शकत नसल्यामुळे कोरोना संसर्गाची शक्‍यता अधिक आहे. हे टाळण्यासाठी यापुढे केशकर्तन कारागीर व ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्कसोबतच फेसशिल्ड वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.
 
सेवा घेणारी व्यक्ती ही मास्क लावू शकत नाही. त्यामुळे केशकर्तन कारागीर, ब्युटी पार्लर चालवणाऱ्या व्यक्ती व कारागिरांनी चेहऱ्यावर मास्क लावून त्यावर फेसशिल्ड लावणे बंधनकारक आहे. जो कारागीर ग्राहकाच्या घरी जाऊन केशकर्तन व दाढी करणार आहे. अशा कारागीरांनी आपल्या चेहऱ्यावर मास्क परिधान करून त्यावर फेसशिल्ड वापरणे बंधनकारक राहील. दिवसभरात सेवा दिलेल्या ग्राहकांची नोंद नोंदवहीमध्ये ठेवणे बंधनकारक राहील. केशकर्तनालयामध्ये व ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी रजिस्टर ठेवावे. या रजिस्टरमध्ये क्रमाक्रमाने येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी. त्याचप्रमाणे दुकानदाराने त्यांना संभाव्य वेळेची सूचना देऊन त्याच वेळी पुन्हा येण्याची विनंती करावी. केशकर्तनालय व ब्युटी पार्लरमध्ये या नोंदीच्या क्रमाने ग्राहकांना सेवा द्यावी. प्रथम ग्राहकाचे काम संपल्यानंतर दुसरा ग्राहक सेवेसाठी दुकानात घ्यावा.
 
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 500 रुपयांपासून दोन हजारापर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे. यामध्ये दुकानात काम करणाऱ्या कारागीराने चेहऱ्यावर मास्क व फेसशिल्ड परिधान न केल्यास संबंधित व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येईल, तसेच दुकानात एका खुर्चीसाठी एका ग्राहकापेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास मनाई आहे. या आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झाल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येईल. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. 

स्थानिक संस्थांनी अंमलबजावणी करावी 

या आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास 2000 रुपये दंड आकारण्यात येईल. तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येईल. ग्रामीण व शहरी या दोन्ही भागांत या आदेशाची अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थेने करावी, असे आदेशात म्हटले आहे.

कन्या शाळेतील चिमुकलीने पॉकेटमनीतून भागवली गरजूंची भूक

पुण्यातील सहायक पोलिस आयुक्तावर भुईंजला खंडणीचा गुन्हा दाखल

सईबाईंच्या समाधीचा लवकरच जिर्णोद्धार

शेतकरी, मजुरांना सरकाराने पगार द्यावा माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

‘क्रांतिज्योती विद्यालय...’च्या यशानंतर ‘मराठी शाळा योजना’ची सुरुवात

SCROLL FOR NEXT