पश्चिम महाराष्ट्र

फक्त एका फाेनवर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मिळणार घरपोच पेन्शन

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. अशा परिस्थितीत सातारा विभागातील वयस्कर, तसेच दिव्यांग पेन्शनर यांच्यासाठी घरपोच पेन्शन देण्याची सुविधा सातारा टपाल विभागाने उपलब्ध केली आहे. अशा पेन्शनधारकांनी त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे. 

खेडोपाड्यात विविध राष्ट्रीयकृत बॅंकांचे ग्राहक आहेत. ज्यांचे खाते आधार संलग्न आहे. त्यांना देखील लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांच्या बॅंक खात्यातील पैसे काढण्यास अडचण निर्माण होत आहेत; परंतु अशा ग्राहकांनाही तेथील पोस्टमनमार्फत एका वेळेस दहा हजार रुपयांपर्यंत "आधार संलग्न भुगतान प्रणाली'द्वारे पैसे देण्याची व्यवस्था केली आहे. बॅंकेच्या ग्राहकांनाही अशी सुविधा पोस्टमनमार्फत घरपोच मिळणार असल्याने त्यांना घराबाहेर पडण्याची आवश्‍यकता नाही. बॅंकेच्या ज्या ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्यात अडचण येत आहे. त्यांनी आपल्या भागातील पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 


औषधेही पाठविता येणार

सध्याच्या काळात वाहतुकीची सर्व साधने बंद असल्याने कोणत्याही वस्तूची ने-आण करणे अशक्‍य झाले आहे; परंतु अशा परिस्थितीत आजारी व्यक्तीपर्यंत औषधे पोचविणे महत्त्वाचे आहे. यासाठी टपाल खात्याने ठराविक ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना ठराविक ठिकाणी औषधे पाठवायची आहेत. त्यांनी विभागीय कार्यालयास (02162) 237443, तसेच प्रधान डाकघर सातारा (02162) 237495 व प्रधान डाकघर कऱ्हाड (02164) 222091 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एम. एस. अहिरराव यांनी केले आहे.

Coronavirus : सातारा जिल्ह्यात काेराेनाचा दूसरी बळी; बाधितांची संख्या झाली सात 

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांची उद्धव सरकारपुढे आर्त हाक

सातारा जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या तपासणीसाठी पाच ठिकाणी केअर सेंटरची स्थापना

मरकजमधील तरूणासह 7 जणांवर गुन्हा ; तपासणी चुकवून लपल्याने दणका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

Fake Pesticide : बनावट कृषी निविष्ठा विक्री प्रकरणी वणी पोलिसांची कारवाई; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT