पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा परिषेदेसाठी शरद पवारांना हवा 'असा' उमेदवार

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेवर शेकापसह महाविकास आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी मी राज्यातील सर्व पक्षप्रमुखांशी चर्चा करतो. जिल्हा परिषदेत सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार द्या, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला केली. 

मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या विजयी सत्कार सोहळ्यासाठी वेळ मिळावी, यासाठी आज माजी आमदार राजन पाटील यांनी बारामती येथे श्री. पवार यांची भेट घेतली. या भेटीत सत्कार सोहळ्यासोबतच संभाव्य अध्यक्ष निवडीबाबतही चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी आपण स्वतः चर्चा करणार असल्याचेही श्री. पवार यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. बुधवारी (ता. 18) शरद पवार हे नागपूरला रवाना होणार असून त्या ठिकाणी अध्यक्ष निवडीबाबत प्रमुख नेत्यांसोबत बैठक होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेत पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी जिल्ह्यातील समविचारी नेते आणि भाजप एकवटले आहेत. या गटाच्याही बैठका सुरू असून उद्या (सोमवारी) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैठक घेणार आहेत. आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राजेंद्र राऊत, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जिल्ह्यातील भाजप व समविचारीच्या नेत्यांसोबत ही बैठक होणार असून या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. 

25 डिसेंबरनंतर बैठक 
महाविकास आघाडीची उद्या (सोमवार) होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक 25 डिसेंबरनंतर होण्याची शक्‍यता आहे. बैठक जरी पुढे ढकलली असली तरीही महाविकास आघाडीचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी अंतर्गत भेटीगाठी सुरू आहेत. 
- बळिराम साठे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT