file photo
file photo 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरमध्ये प्रा. धोंडेंसह दिग्गज नेते ताब्यात

सकाळवृत्तसेवा

रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा जाळली, जनजीवन सुरळीत

सोलापूरः विद्यापीठाला ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वरांचे नाव द्यावे या मागणीसाठी शिवा संघटनेने आज (सोमवार) बंद पुकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सकाळपासून शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह दिग्गज नेत्यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार शिवशरण पाटील यांचाही ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, रेल्वे स्थानकाजवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा जाळल्याची घटना सकाळी घडली. त्यानंतर पोलिसांनी शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरूवात केली आहे. फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र ताब्यात घेतलेल्यांची संख्या मात्र अद्याप कळू शकलेली नाही.

जनजीवन सुरळीत
बंदच्या काळात पोलिसांच्या कडेकोड बंदोबस्तात जनजीवन सुरळीत आहे. यात नवी पेठ, चाटी गल्ली, बेगम पेठ, 70 फूट रोड येथील दुकाने बऱ्यापैकी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे घरगुती साहित्याची खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT