Husband killed wife  sakal
सोलापूर

चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा खून; पतीस अटक

माढा तालुक्यातील दहिवली येथील घटना

संतोष पाटील

टेंभुर्णी : चारित्र्याच्या संशयावरून (suspicion of character)पतीने पत्नीला शिविगाळ करून कोणत्या तरी धारदार शस्त्राने छातीच्या उजव्याबाजूस वार करून तिला गंभीर जखमी केले. पुढील उपचारासाठी सोलापूरला घेऊन गेले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. माढा तालुक्यातील दहिवली येथे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात (Tembhurni Police Station)पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास टेंभुर्णी पोलीसांनी अटक केली आहे.

आश्विनी सुनिल पोटरे ( वय- 30 रा. दहिवली ता. माढा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी रघुनाथ चांगदेव पोटरे( वय- 31 रा.दहिवली)याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती सुनिल चांगदेव पोटरे ( रा. दहिवली ता. माढा) यास पोलीसांनी अटक केली आहे. या विषयी पोलीसांकडून समजलेली अधिक माहिती अशी , रघुनाथ पोटरे हे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जर्शी गायींच्या धारा काढत असताना त्याचा सख्खा भाऊ सुनिल पोटरे याच्या घरातून बाईच्या ओरडण्याचा जोराचा आवाज आला. त्यामुळे हातातील काम टाकून रघुनाथ पोटरे त्याची पत्नी मनिषा तसेच भाऊ अनिल त्याची पत्नी गोकुळा असे सर्वजण सुनिलच्या घराकडे धावत आले.(Husband killed wife )

घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली होती. सुनिलची पत्नी ओरडत होती तर सुनिल तिला शिवीगाळ करीत मारहाण करीत असल्याचा आवाज येत होता. रघुनाथ व इतर लोक सुनिलला दरवाजा उघड म्हणत होते परंतू सुनिल दरवाजा उघडत नव्हता त्यामुळे शेडच्या बाजूचा पत्रा उचकटून सर्वजण आत गेले.सुनिलला पत्नी आश्विनीच्या अंगावरून बाजूला ओढले. त्यावेळी आश्विनीच्या छातीच्या उजव्याबाजूकडुन भरपूर रक्तस्त्राव होत असल्याने शेजारी रहाणार्या जगन्नाथ याच्या चारचाकी वाहनातून टेंभुर्णी येथे उपचारासाठी हलविले. परंतू रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पुढील उपचारासाठी ताबडतोब सोलापूरला घेऊन गेले. परंतू उपचारापूर्वीच आश्विनीचा मृत्यू झाला. मयत आश्विनी हिला मुलगी वैश्णवी व मुलगा शुभम ही दोन मुलं आहेत. टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी ओमासे करीत आहेत.(Crime news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Full Schedule : भारत आता पुढच्या कसोटी मालिकेत तगड्या स्पर्धकाला भिडणार, जाणून घ्या २०२६ पर्यंतचं वेळापत्रक

Mumbai Metro: मेट्रोचा प्रवास सोपा होणार! तिकिटांसाठी रांग लावण्याची गरज नाही, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बुकिंगची सेवा सुरू, प्रक्रिया काय?

Latest Marathi News Live Update : ठाण्याकडून मुंबईकडे येणाऱ्यांना मोठा फटका! घाटकोपर ते सायनपर्यंत वाहतूक ठप्प; खासदार संजय राऊतांनाही ट्रॅफिकचा सामना!

Kannan Gopinathan : IAS पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोण आहेत कन्नन गोपीनाथन? त्यांनी कलम 370 विरोधात उठवला होता आवाज

Political War : रणसंग्राम! मिनीविधानसभेचे आरक्षण ठरले, इच्छुकांच्या जोडण्या सुरू; अनेकांकडून स्टेट्स वॉर

SCROLL FOR NEXT