Nitesh Rane esakal
सोलापूर

हिंदुत्व आमचा श्वास, त्याला धक्का लावाल तर..; औरंगजेब, टिपू सुलतानचं स्टेटस ठेवणाऱ्यांना नीतेश राणेंचा थेट इशारा

हिंदूविरोधी औरंगजेब तसेच टिपू सुलतानचे स्टेटस ठेवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मी आलो आहे.

सकाळ डिजिटल टीम

वेळापूर येथे ५ जुलैला चार तरुणांनी इन्स्टाग्रामला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस व्हिडिओ ठेवल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.

वेळापूर : छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांचे लाड सहन केले जाणार नाहीत. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, त्यास धक्का लावाल तर परिणामांना सामोरे जा, असा थेट इशारा भाजप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.

ते वेळापूर (ता. माळशिरस) येथे आयोजित सकल हिंदू मोर्चाला (Hindu Morcha) संबोधित करताना बोलत होते. आमदार राणे पुढे म्हणाले, सक्तीने धर्मांतर, गोहत्या, लव्ह जिहाद (Love Jihad) यांसारख्या घटना घडविणाऱ्यांना आणि हिंदूविरोधी औरंगजेब तसेच टिपू सुलतानचे स्टेटस ठेवणाऱ्यांना इशारा देण्यासाठी मी आलो आहे.

आमदार राम सातपुते यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध करतानाच हिंदू विरोधी अपप्रवृत्तींना इशारा दिला. तर धैर्यशील मोहिते- पाटील यांनी तथाकथित तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याऐवजी मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्टेटस ठेवण्याचा सल्ला दिला.

वेळापूर येथे ५ जुलैला चार तरुणांनी इन्स्टाग्रामला औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस व्हिडिओ ठेवल्यानंतर सामाजिक तेढ निर्माण झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. स्टेटस प्रकरणाचा निषेध म्हणून सकल हिंदू मोर्चाचे आयोजन केले होते.

तत्पूर्वी दुपारी दीडच्या सुमारास आमदार राणे, सातपुते आणि मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत पालखी चौकातील छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून मोर्चाची सुरवात झाली. अर्धनारी नटेश्वर मंदिरात महाआरतीनंतर मोर्चा जुना बाजारपेठ, व्यापारी पेठ, जुने एसटी बस स्थानक मार्गे पालखी मैदानावर सभास्थळी दाखल झाला.

मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकल हिंदू मोर्चाचे संयोजक स्वप्नील माने-देशमुख, संतोष खराडे, ओंकार आडत यांच्यासह ५ जुलैच्या स्टेटस प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल केलेले प्रशांत सावंत, सोमनाथ कोडक आणि माजी सैनिक भीमराव इंगोले यांचा सन्मान झाला.

मोर्चामधील ठळक बाबी...

  • सभास्थळ, मोर्चा मार्गासह सर्वच ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त

  • आमदार राणे, सातपुते, मोहिते- पाटील यांचा स्टेटस प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संताप

  • मोर्चा मार्गावर संयोजकांनी लावल्या भगवे झेंडे आणि पताका

  • स्टेटस प्रकरणी दबाव येऊनही गुन्हे दाखल करणाऱ्या तरुणांचा झाला सन्मान

  • मोर्चाच्या निमित्ताने लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या विषयांवरही आमदार राणेंचा गंभीर इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT