sugarcane_ 
सोलापूर

मोठी ब्रेकिंग ! लॉकडाउनमध्ये अडकली सोळाशे कोटींची एफआरपी 

तात्या लांडगे

सोलापूर : लॉकडाउनमुळे साखर निर्यातीवरील बंदी तर देशाअंतर्गत घटलेल्या साखर विक्रीची कारणे पुढे करीत 67 कारखानदारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक हजार 593 कोटी 58 लाखांची एफआरपी अडविली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गाळप हंगामात राज्यातील 142 साखर कारखान्यांनी 505 लाख 47 हजार मे.टन उसाचे गाळप केले होते. 

राज्यातील साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये तब्बल 90 लाख मे.टन साखर शिल्लक आहे. दुसरीकडे निर्यात केलेल्या साखरेवरील तब्बल बाराशे कोटींचे अनुदानही केंद्र सरकारकडून अद्याप मिळालेले नाही. तत्पूर्वी, राज्यातील महापूर, अतिवृष्टीमुळे कमी झालेला ऊस आणि घटलेला साखर उतारा, यामुळे गाळप हंगाम महिनाभर लांबणीवर पडला होता. हंगाम संपण्यापूर्वीच राज्यात कोरोना या विषाणूचा धोका निर्माण झाला आणि राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण साखर उद्योग संकटात सापडला आणि बळीराजासमोरील अडचणीत पुन्हा मोठी वाढ झाली. आता लॉकडाउन कधीपर्यंत राहणार अन्‌ एफआरपी कधी मिळणार, याची चिंता बळीराजाला सतावू लागली आहे. 

कामगारांचे चार महिन्यांपासून थकली पगार 
राज्यातील 142 साखर कारखान्यांनी मागील गाळप हंगामात उसाचे गाळप केले. महापूर व अतिवृष्टीमुळे विलंबाने सुरु झालेला हंगाम संपण्यापूर्वीच राज्यात कोरोना या विषाणूने पाय पसरला. संपूर्ण देशातील लॉकडाउनमुळे कारखान्यांच्या गोदामांमध्ये तब्बल 90 लाख टन साखर शिल्लक आहे. निर्यात बंद झाली तर देशाअंतर्गत घाऊक विक्रीतही मोठी घट झाली. मागील तीन वर्षांपासून साखर उद्योग अडचणीत सापडल्याने कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळू शकलेले नाही. मागील चार-पाच महिन्यांपासून राज्यातील 40 हून अधिक साखर कारखान्यांमधील 14 हजारांहून अधिक कामगारांचे वेतन आता पुन्हा लॉकडाउनमध्ये अडकल्याची माहिती साखर आयुक्‍तालयातील सूत्रांनी दिली. 

एफआरपी देण्याचे कारखान्यांना निर्देश 
राज्यातील 142 पैकी 67 साखर कारखान्यांकडे नुकत्याच पार पडलेल्या गाळप हंगामातील एक हजार 207 कोटी 97 लाखांची एफआरपी प्रलंबित आहे. लॉकडाउन असल्याने आणि साखर शिल्लक असल्याने अडचणीत येत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्‍कम तत्काळ वितरीत करावी, असे निर्देश संबंधित साखर कारखान्यांना दिले आहेत. 
- मंगेश तिटकारे, सहसंचालक, साखर 


राज्यातील मागील गाळपाची स्थिती 
एकूण साखर कारखाने 
142 
एकूण उसाचे गाळप 
505.47 लाख मे.टन 
एकूण एफआरपी 
11,633.08 कोटी 
प्रलंबित एफआरपी 
1593.58 कोटी 
गोदामांमध्ये शिल्लक साखर 
90.23 लाख टन  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT