sharad pawar  Esakal
सोलापूर

Sharad Pawar: फळबाग‌ शेतकऱ्यांसाठी ड्राय फोर्ट उभारण्यासाठी प्रयत्न करू; पवारांचे आश्वासन

वसंत कांबळे

Sharad Pawar: सोलापूर जिल्हा तून फळ बागाचा माल कंटेनर ने इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशात जात असेल? तर इथे सुध्दा विदर्भ, जालन्या च्याधरतीवर सोलापूर येथे ही ड्राय फोर्ट उभारण्यात यावा ही मागणी आहे.

त्याच्यावर सुध्दा मार्ग काढण्यासाठी नितिन कापसे यांच्याशी संपर्क साधेन व जे महत्त्वाचे प्रश्न एकत्रित माझ्याकडे द्या त्या कामांना गती कशी देता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कापसे वाडी ता माढा येथे कृषीनिष्ट परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले.

यावेळी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सोपान कांचन, माजी आमदार विनायकराव पाटील, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनाजी साठे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव,विठ्ठल सह साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील,माढ्याच्या नगराध्यक्ष मिनलताई साठे, विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संजय पाटील घाटणेकर,मोहोळ चे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, दादासाहेब साठे, बाळासाहेब पाटील, सुभाष गुळवे, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, बार्शी चे विश्वास बारबोले, सुहास पाटील जामगावकर, नागेश फाटे,सौ अनिताताई कापसे, गणेश पाटील,कृषीनिष्ट परिवाराचे नितीन कापसे, चौबेपिपंरी चे उपसरपंच योगेश जाधव आदी मान्यवर व द्राक्ष, दुध, टॉमेटो उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बळीराम साठे,सोपान कांचन , मिनलताई साठे,संजय पाटील घाटणेकर, अभिजित पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक कृषीनिष्ट परिवाराचे नेते नितीन कापसे यांनी केले

पवार पुढे बोलताना म्हणाले की, अनेक सहकारी होते त्यापैकी नामदेवराव जगताप, विठ्ठलराव शिंदे ,विरुपाक्ष शिवदारे, यांच्या सारखे अनेक सहकारी होते त्या सगळ्यांनी कष्ट करुन सोलापूर जिल्हा दुष्काळतुन बाहेर काढायला हातभार लावला.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित केले व उजनी धरणाचा सुदैवाने फायदा झाला. सांगोल्याला दाळींब, याभागात द्राक्ष, वेगवेगळ्या भागात अनेक पिकं घेऊन क्रांती केली आहे.सोलापूर जिल्हा फळबाग शेतीसाठी अतिशय चांगला आहे असे शास्त्रज्ञांचे मत आहे

या अगोदर महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त ऊस उत्पादनात व कारखानदारीमध्ये नगर जिल्ह्याचा नंबर लागायचा राज्यामध्ये नंतर कोल्हापूर नंतर सोलापूर आता हे चित्रपटातले असून सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्रात साखर उत्पादनात आणि कारखाना साठी प्रथम नंबर व फळबाग उत्पादनातील प्रथम नंबर आहे. या अगोदरच्या वक्त्यांनी काही प्रश्न मांडले हे प्रश्न राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संबंधित आहेत. सध्या मी कुठेच नाही पण त्याची काय चिंता करू नका.

कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे. असे म्हणताच उपस्थित शेतकऱ्यांनी हसून व ओरडून दाद दिली. तुमच्या सर्व समस्यांची नोंद मी घेतलेली आहे . याच्यानंतर प्रमुख सहकार्यांना घेऊन एक दिवस चर्चा करेन राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलायचं हे ठरवून त्यातून तुमची सुटका होईल याची तुम्ही काळजी करू नका

या जिल्ह्याचा माझा 1972 पासून घनिष्ठ संबंध आहे. अनेक माणसं जीवाभावाचे आहेत. राजकारणात काहीही असेल पण त्यांनी माणुसकी आमच्याशी कधीही तोडली नाही. अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली काही ठिकाणी राजकारणावेळी त्यांच्या मनासारखं काम न केल्यामुळे त्यांच्या वर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करण्याचं काम करतात.

मी एवढेच सांगू इच्छितो जसं कर्जमाफी मध्ये कोणाची फसवणूक केली असेल? प्रमाणिकपणे शेतकऱ्यांसाठी काम करतायेत म्हणून दबावचं राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा कसा संपवायचा याचा विचार आम्ही करु? त्याची काळजी तुम्ही करु नका? असं नाव घेता टीका स्थानिक नेतृत्वावर केली.

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन उल्लेख केला पवार यांना शेतीचं काय कळतं ?हे काय नवीन नाही. कदाचित तुम्हाला आठवत असेल अमित शहा नावाचे ग्रहस्त एकदा या जिल्ह्यात निवडणूकीच्या आधी प्रचाराला आले होते. त्यांनी हे सांगितलं शरद पवार को क्या समजता है? आणि लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला.आणि सांगितले की त्यांना हे समजतं.

एकर दाळींब व एक एकर द्राक्ष यावरुन शेतीतुन वेगळे प्रयोग करून द्राक्ष क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांपासून काम करणाऱ्या नितीन कापसे यांच्या कार्याचा पाडा वाचत कार्याचे कौतुक केले.त्याच परिणाम म्हणून मी हेलिकॉप्टर मधुन येताना पाहिले की पश्चिम भागात सर्व ऊस दिसला व पुर्व भागात द्राक्ष च्या बागा पाहायला मिळाल्याचे विशेष उल्लेख केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! १५ जणींच्या संघात कोणाला मिळाली संधी?

New Luggage Rules : विमान प्रवासाप्रमाणे रेल्वेतही लागू होणार 'लगेज नियम', अतिरिक्त साहित्य घेऊन जाणं पडणार महागात...नेमका निर्णय काय?

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : पुणे ते मुंबई जाणारी डेक्कन एक्स्प्रेस मुसळधार पावसामुळे रद्द!

Mumbai Rain Alert: घाटकोपर-अंधेरी लिंक रोड बंद; साकीनाका परिसरात पाणीच पाणी

'हम आपके हैं कौन' साठी कुणाला किती मिळालेलं मानधन? माधुरीला सगळ्यात जास्त तर रीमा लागूंना मिळालेले फक्त...

SCROLL FOR NEXT