logo
logo 
सोलापूर

मातंग समाजाचा सोलापुरात विराट निषेध मूक मोर्चा 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून ऍड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून या खटल्यात नियुक्ती करावी या प्रमुख मागण्यांसाठी सोलापुरातील आज सोलापुरातील मातंग समाजाने विराट निषेध मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट निषेध मोर्चात युवक, महिलांची संख्या लक्षणीय होती. 
हेही वाचा - बळिराजाला फटका! अवकाळीमुळे नुकसान नसल्याचा अहवाल 
सोलापुरातील अत्याचाराच्या घटनेतील उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करा, नराधमांना फाशीची शिक्षा द्या या मागण्यांचे फलक घेऊन युवक, युवती, महिला या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मोर्चात सहभागी झालेल्या बहुतांश नागरिकांनी काळे कपडे परिधान केले होते. हातात काळे झेंडे, दंडावर काळी पट्टी बांधून या घटनेचा निषेध करण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यासह मातंग समाजातील विविध संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 
हेही वाचा - नीरा पाणी वाटपावरून पुन्हा राजकीय वादळ 
सामूहिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाहनांचा वापर केला जातो. ही वाहने जप्त करून या वाहनांचा परवाना रद्द करावा, अल्पवयीन पीडित मुलगी निराधार असल्याने पीडिताच्या कुटुंबासह जिल्ह्याच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करावे, पीडितेला योग्य ते संरक्षण द्यावे, शासनाने तिच्या शिक्षणाचा खर्च करावा व तिला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशा मागण्यांचा निवेदनातून करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी युवराज पवार, सुरेश पाटोळे, गोविंद कांबळे, राजू क्षीरसागर, रमेश बोराडे, बाळासाहेब तांबे, लखन गायकवाड, हिरा आडगळे, शिवाजी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक विनोद भोसले, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, वंचित बहुजन विकास आघाडीचे आनंद चंदनशिवे, बाळासाहेब वाघमारे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT