सोलापूर

लोकवर्गणीतुन साकारली कामती बुद्रुक येथील पोलिस ठाण्याची इमारत

राजकुमार शहा

अनेकांनी केलेल्या वस्तू रुपी मदतीमुळेच हे शक्य झाल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली.

मोहोळ (सोलापूर) : कामती बुद्रुक (ता. मोहोळ) येथील नवीन पोलिस ठाण्याची (new police station) इमारत (building) बांधून पूर्ण झाली असून, ही इमारत वेगवेगळ्या कंपन्या व लोकवर्गणीतून साकारण्यात आली आहे. यामुळे गेल्या 11 वर्षापासूनची पोलिसांची अडचण दूर झाली आहे, तर कामात सुसूत्रता येणार आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनामुळे व अनेकांनी केलेल्या वस्तू रुपी मदतीमुळेच हे शक्य झाल्याची माहिती या पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी दिली. (the new police station building at kamati budruk has been completed by the people)

मोहोळ पोलिस ठाण्याचे विभाजन करून स्वतंत्र कामती पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली 28 गावांचा कारभार चालतो. 2010 पासून पोलिसांचे कामकाज एका पत्राशेडमध्ये, राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सुरू आहे. विविध वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, आवाज, नागरिकांचा गोंगाट, यामुळे पोलिसांना काम करणे अडचणीचे ठरत होते. पुरेसे लॉकअप नाही, त्यामुळे आरोपींना मोहोळ किंवा मंद्रूप पोलिस ठाण्यांच्या लॉकअपमध्ये ठेवावे लागते, त्यात वेळ व श्रम मोठे वाया जातात. कामती पोलिस ठाण्याच्या अधिपत्याखाली कुरुल, कामती व बेगमपूर ही तीन बीट आहेत. सध्याची नवीन इमारत मंगळवेढा सोलापूर महामार्गा नजीक असल्याने दळणवळण ही सोयीचे झाले आहे.

प्रत्यक्षात वरिष्ठांशी व इतरांशी चर्चा झाल्यानंतर कामाला चार महिन्यापुर्वी सुरवात झाली .कामती बुद्रुक व कामती खुर्द या दोन्ही गावाच्या मध्यभागी ही इमारत साकारली आहे. कोणाकडून ही पैसे घ्यावयाचे नाहीत या प्रमाणे सिमेंट खडी, स्टील, दारे-खिडक्या, रंग, या वस्तू रूपाने सर्वांनी मदत केली. त्यात बालाजी अमाईन्स, एस एम अवताडे आणि कंपनी, सरपंच रामराव पाटील, शिवानंद पाटील, राष्ट्रीय महामार्ग विभाग यांचे मोठे योगदान लाभले आहे.

या नवीन इमारतीत एकूण बारा खोल्या आहेत त्यात अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी यांचे विश्रांती कक्ष आहेत, तर सहाय्यक पोलिस निरीक्षक कक्ष हा स्वतंत्र आहे. सर्वसामान्यांसाठी लागणाऱ्या शौचालयाच्या उभारणीची जबाबदारी सरपंच पाटील यांनी स्वीकारली आहे. आमदार यशवंत माने यांनी पेव्हर ब्लॉक बसवून देणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माने यांनी सांगितले. लॉकडाऊनचा कालावधी संपताच नवीन इमारतीत कामकाज सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कामती पोलिस ठाण्याची सद्यस्थिती

एकूण बीट- 3

पोलिस कर्मचारी- 54 बांधकामाचा कालावधी चार महिने मंगळवेढा- सोलापूर महामार्गावरील महत्त्वाचे पोलिस ठाणे

(the new police station building at kamati budruk has been completed by the people)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT