पश्चिम महाराष्ट्र

बाबा, मी शाळेत जाऊ कशी? 

संजय जामदार

कोळकी (जि. सातारा) : फलटण तालुक्‍याच्या ग्रामीण भागामधून फलटण येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. त्यामुळे विद्यार्थिनी बाबा, मी शाळेत जाऊ कशी? असा प्रश्न पालकांना विचारताना दिसत आहेत.

हेही वाचा - त्यांनी झिडकारले; पोलिसाने कवटाळले !
 
फलटण तालुक्‍यातील गिरवी, निरगुडी आदर्की, हिंगणगाव, सांगवी, झिरपवाडी, दुधेबावी, कोळकी, निंभोरे, सुरवडी, तरडगाव, लोणंद, विडणी, विंचुर्णी येथून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी विद्यार्थिनी फलटणला दररोज येतात. फलटणला मुधोजी कॉलेज, मुधोजी हायस्कूल, फलटण हायस्कूल, यशवंतराव चव्हाण हायस्कूल, सौ. वेणूताई हायस्कूल, शेतीशाळा, हणमंतराव पवार हायस्कूल, आयटीआय, नर्सिंग कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, तसेच अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.
 
शाळा, कॉलेजसाठी गावाकडून फलटणमध्ये येण्यासाठी बस मिळतात. मात्र, संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा, कॉलेज सुटल्यानंतर पुरेशा बस नसतात. बसला नेहमी प्रचंड गर्दी असते. इतर प्रवासी, विद्यार्थी धक्काबुक्की  करून बसमध्ये चढतात. मात्र, मुलींना बसमध्ये चढता न आल्याने त्यांना काही बस सोडाव्या लागतात.

सध्या शाळूचे दिवस असल्याने लवकर अंधार पडतो. घरी लवकर दिवसा जाता यावे म्हणून या विद्यार्थिनी अखेर खासगी वडापचा आसरा घेताना दिसतात. वडापमध्ये कसल्याही प्रकारची सुरक्षा नसते. स्टॅंडसमोर किंवा जवळ असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये वडापच्या गाड्या उभ्या असतात. चौकात टारगट मुलांकडून छेडछाडीचे प्रकार सर्रास घडतात.

हेही वाचा - सेना आमदाराच्या तक्रारीवर एसपींचे हे उत्तर

एसटी स्टॅंडच्या जवळपास दोन दारूची दुकाने, दोन बियर बार, दोन देशी दारूची दुकाने असून, या दारूड्यांचा त्रासही त्यांना सहन करावा लागतो. आपली बदनामी नको, म्हणून या विद्यार्थिनी निमुटपणे हा त्रास सहन करीत आहेत. एवढ्या मोठ्या एसटी स्टॅंडसाठी केवळ एक पोलिस कर्मचारी तैनात आहे. हा एक पोलिस दादा आमचे रक्षण कसे करणार? असा सवाल विद्यार्थिनी विचारीत आहेत.
 
मुधोजी, यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण हायस्कूल सोडले तर इतर सर्व शाळा, कॉलेजस एसटी स्टॅंडपासून लांब अंतरावर आहेत. विद्यार्थिनी चालत जातात. रस्त्यावरून जाताना "रोडरोमिओ' आपल्या गाड्या वाकड्या तिकड्या चालवणे, मोठ्याने हॉर्न वाजवणे, अश्‍लील संभाषण करणे हे नित्याचेच झाले आहे.

नक्की वाचा - Video : मुली म्हणतात...अब हम से है मुकाबला !

काही पालक जीवावर दगड ठेऊन आपल्या मुलींना फलटणला पाठवत आहेत. अनेक पालकांनी आपल्या मुलींचे उच्च शिक्षण अर्धवट बंद केल्याचे विदारक चित्र आहे. राजकीय व प्रशासकीय क्षेत्रामधील मान्यवरांनी हा संवेदनशील प्रश्न गांभीर्याने सोडवावा, अशी आर्त हाक विद्यार्थिनी देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT