संख ः काँग्रेस आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना एम. बी. पाटील. व्यासपीठावर विक्रम सावंत यांच्यासह मान्यवर.
संख ः काँग्रेस आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना एम. बी. पाटील. व्यासपीठावर विक्रम सावंत यांच्यासह मान्यवर. 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : ‘तुबची’चे पाणी आठ दिवसांत संखला

सकाळ वृत्तसेवा

जत - तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः व आमच्या सरकारने केली आहे. त्याचे जनक आम्ही आहोत. आज हे पाणी जत पूर्व भागात मोठेवाडी, भिवर्गी, तिकोंडी इथपर्यंत आलेय. हे पाणी तुबची योजनेचे आहे. आठ दिवसांत ते संखसह पूर्व भागातील तेरा तलावांत सोडू, असे प्रतिपादन कर्नाटकचे माजी मंत्री तथा आमदार एम. बी. पाटील यांनी केले.

काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ संख, उमदी या ठिकाणी जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश महासचिव सचिन सावंत, आमदार आनंद न्यामगोंड, विक्रम सावंत, आप्पाराया बिरादार, संतोष पाटील, सुजय शिंदे, भुपेंद्र कांबळे आदी उपस्थित होते. 

श्री. पाटील म्हणाले,‘‘कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना ३ हजार ६०० कोटी रुपये खर्च करून तुबची बबलेश्वर योजनेची निर्मिती मी स्वतः आणि आमच्या सरकारने केली. मात्र, योजनेचा दूरवर संबंध नसताना मूल आमचं अन्‌ पालकत्व माझं असं भाजप करू पाहत आहे.’’

आमदार पाटील म्हणाले,‘‘जत तालुक्‍याला आम्ही कधीच वेगळे समजले नाही, हा भाग गडीनाड विभागात मोडतो. विशेष स्नेहबंध आमच्या राज्याशी आहेत. कर्नाटक सरकारने नेहमीच या भागावर प्रेम केले आहे. आज तुबची योजनेच्या माध्यमातून या भागाला पाणी देण्यास आम्ही नेहमीच सकारात्मक पाऊल टाकले. पूर्वभागातील ४८ गावांना तुबचीचे पाणी मिळावे म्हणून सावंत यांनी माझ्याकडे व कर्नाटक, महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. ही योजना तयार करताना जतसह कर्नाटकातील चडचण, इंडी भागातही पाणी जाईल, असा आराखडा केला आहे. भाजपसह विरोधक ही योजना छोटी असल्याचे सांगत आहेत. त्यात तथ्य नाही. या योजनेच्या पाईप या एकावर एक तीन माणसे उभारतील इतक्‍या मोठ्या आहेत. दूरदृष्टिकोन ठेवून या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT