Rain Monsoon esakal
पश्चिम महाराष्ट्र

Monsoon Update : रोहिणी, मृग नक्षत्रांकडून अपेक्षाभंग; पेरणीचं गणितच बिघडलं, शेतकरी संकटात!

पावसाच्या पहिल्या दोनही नक्षत्रांनी अपेक्षाभंग केल्याने शेतकऱ्यांवरील चिंतेचे सावट गडद बनले आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या आकाशात केवळ ढगांचे पुंजके विरत आहेत. ते पाहून सर्वच जण निराश बनत आहेत.

निपाणी : पावसाच्या पहिल्या दोनही नक्षत्रांनी अपेक्षाभंग केल्याने शेतकऱ्यांवरील चिंतेचे सावट गडद बनले आहे. पाऊस लांबत चालल्याने सर्वच जण हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून परिसरात निर्माण होणाऱ्या ढगाळ वातावरणाने पावसासाठी थोड्या आशा पल्लवीत होत असल्या तरी क्षणात बदलणाऱ्या वातावरणाने त्यावर पुन्हा विरजण पडत आहे.

एका बाजूला पंचांगकर्ते, भविष्यवेत्ते, हवामान खाते सरासरी एवढ्या पावसाचे अनुमान व्यक्त करत आहे. पण प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. निसर्गाला जाळून काढणारा उन्हाळा जूनच्या अंतिम टप्प्यातही आपले रूप बदलायला तयार नाही. प्रथम मान्सूनपूर्व, वळवाचा पाऊस यंदा झालाच नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागती रखडल्या. पुढे रोहिणी नक्षत्रही कोरडे गेल्याने अपेक्षावर पाणी फिरवले. आता मृग नक्षत्रही संपत आले तरी पावसाचा पत्ता नाही.

पावसासाठी साऱ्यांच्याच नजरा अशाळभूतपणे आभाळाकडे लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, तलाव, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. धरणातील पाणीसाठाही संपल्याने आता परिसरातून वाहणाऱ्या चिकोत्रा, वेदगंगा नद्याही कोरड्या पडल्या आहेत. शहर व ग्रामीण भागात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. ऊस आणि नदीकाठी मे महिन्यात पेरलेले सोयाबीन जगवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरिपाच्या पेरणीचे तर संपूर्ण गणितच बिघडले आहे.

पेरणीची घाई करू नका

प्रथम रयत संपर्क केंद्र व शासकीय यंत्रणा खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून बी-बियाणांच्या वितरणात सक्रिय झाली मात्र आता चांगला पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीला पूर्ण वापसा आल्याशिवाय पेरणीची घाई करू नका अन्यथा अडचणीत याल, असे शेतकऱ्यांना आवाहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

साऱ्यांचीच चिंता वाढली

सध्या आकाशात केवळ ढगांचे पुंजके विरत आहेत. ते पाहून सर्वच जण निराश बनत आहेत. कोरडा दुष्काळ पडेल की काय, अशी सार्वत्रिक भीती व्यक्त होत आहे. एका बाजूला पेरणीची तयारी तर दुसऱ्या बाजूला परिसरातून वाहणाऱ्या नद्यांच्या पूर नियंत्रणाबरोबरच मदत व बचावकार्य योग्य पातळीवर व्हावे, म्हणून नियोजन करत असताना पावसाने सलगच्या दोन्ही नक्षत्रात दडी मारल्याने साऱ्यांचीच चिंता वाढली आहे.

या आठवड्यात पावसाने साथ दिल्यास बिघडलेला खरिपाचा हंगाम सावरता येईल. परंतु आता वातावरण बदलत असूनही पाऊस पडत नसल्याने मनात भीती वाटत आहे.

-संतोष खराडे, शेतकरी, शिरगुप्पी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT