Witchcraft in Haripur Gram Panchayat Election esakal
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत भानामतीचा प्रकार; गावच्या वेशीवर ठेवल्या काळ्या बाहुल्या

ग्रामपंचायत निवडणुकीचे सध्या जोरात वारे आहे.

सकाळ डिजिटल टीम

अंधश्रद्धा पसरवण्याच्या प्रकारांविरोधात पोलिसांनी पाळत ठेवून संबंधितांवर कारवाई करावी.

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथील ग्रामपंचायत निवडणूक (Haripur Gram Panchayat Election) प्रचाराच्या काल (शुक्रवार) सांगतेदिवशी गाववेशीवर काळी जादू (Witchcraft) करण्यात आली. असा प्रकार यापूर्वीच्या दोन निवडणुकांवेळीही करण्यात आला होता.

मोहिते आघाडीचे कार्यकर्ते सचिन फाकडे, परसु फाकडे, ओंकार भोई यांनी या सर्व काळ्या बाहुल्या एकत्रित करून त्यांचे दहन केले. अशा अंधश्रद्धा पसरवण्याच्या प्रकारांविरोधात पोलिसांनी पाळत ठेवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुकीचे सध्या जोरात वारे आहे. सत्ताधारी संगुदादा बोंद्रे पॅनेलचे नेते अरविंद तांबवेकर यांच्या पत्नी राजश्री, हरिपूर विकास आघाडी मोहिते पॅनेलतर्फे पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक मोहिते यांच्या पत्नी शोभा, माजी आमदार संभाजी पवार गटाचे स्थानिक कार्यकर्ते विकास बोंद्रे यांच्या पत्नी व संगुदादा बोंद्रे यांच्या नातसून कविता, अशोक मोहिते यांना गेल्या पंचायत समिती निवडणुकीवेळी आव्हान दिलेले संजय सावंत यांच्या पत्नी अश्‍विनी अशा चौघीजणींत सरपंचपदासाठी लढत आहे.

मोहिते आणि बोंद्रे गटादरम्यान पारंपरिक लढतीत अन्य दोघींच्या उमेदवारीमुळे मोठी रंगत आली आहे. बहुतेक प्रचार शांततेत संपला असताना आज सकाळी गाववेशीवर काळ्या जादूचा प्रकार लक्षात आला. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा हा प्रकार ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन निवडणुंकावेळीही झाला होता. आज सकाळी हा प्रकार लक्षात आला. मोहिते गटाचे फाकडे सचिन फाकडे यांनी या सर्व बाहुल्या एकत्र करून पेटवून दिल्या. अशा अंधश्रद्धांना ग्रामस्थ थारा देणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

Central Railway: कर्जत-खोपोली प्रवास आरामदायी होणार, १५ डब्यांच्या लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; पाहा वेळापत्रक

Kailas Patil : ‘ऑपरेशन टायगर’चा दुसरा भाग? कैलास पाटील शिंदे गटात जाणार?

अभिजीत खांडकेकरची मेहुणी आहे ही मराठी अभिनेत्री; गाजवतेय मालिका; म्हणते- माझ्या लग्नात त्यांनी खुर्च्या उचलल्यात...

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

SCROLL FOR NEXT