पिंपरी-चिंचवड

अठरा ते तीस वर्षांतील युवक-युवतींना संधी; रोजगारांसाठी ‘लाइट हाउस’ प्रकल्प

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - तुमचे वय १८ ते ३० वर्षांतील आहे, तुम्ही बेरोजगार आहात, स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी जागा हवी आहे, प्रशिक्षण हवे आहे, अन्य मूलभूत सुविधा हव्या आहेत, तर मग घाबरू नका... आता या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. तुमच्या समस्या सुटणार आहेत. त्याही अगदी मोफत, मग, तुम्ही युवक असा अथवा युवती. हवी फक्त तुमची इच्छाशक्ती. कारण, तुमच्या रोजगारासाठी महापालिकेने आणला आहे ‘लाइट हाउस’ प्रकल्प.

महापालिकेचा नागरवस्ती विकास योजना विभाग आणि लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याची शिफारस महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी २०१९ मध्ये केली होती. महिला व बालकल्याण समितीने या प्रस्तावास डिसेंबर २०१९ मध्ये आणि स्थायी समिती सभेने जानेवारी २०२० मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यानंतर लॉकडाउन जाहीर झाले. त्यातच साधारणतः आठ महिन्यांचा कालावधी गेला. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. त्यामुळे ‘लाइट हाऊस’ प्रकल्पाला मुहूर्त मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

असा असेल प्रकल्प
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये जागांच्या उपलब्धतेनुसार ‘लाइट हाउस’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील युवक व युवतींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी मुलभूत सोयीसुविधा महापालिका विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये जागा, संगणक संच आदींचा समावेश आहे. यात सहभागी युवक-युवतींना लाइट हाउस कम्युनिटी फाउंडेशनतर्फे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ व अनुषंगीक खर्च सीएसआर अर्थात सामाजिक दायित्व निधीतून केला जाणार आहे. पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील एका सभागृहात प्रशिक्षण दिले जाईल. त्यासाठी आवश्‍यक सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार आहे. एक लाइट हाउस प्रकल्प किमान तीन वर्षे कालावधींचा असेल.

असा असेल प्रकल्प
काय - लाइट हाउस प्रकल्प
कशासाठी - रोजगार निर्मितीसाठी
कोणासाठी - १८ ते ३० वर्षांतील युवक-युवती
कसा - सीएसआर फंडातून मोफत
कुठे - सावित्रीबाई फुले स्मारक, पिंपरी
कालावधी - किमान तीन वर्षे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT