Express-Way-Container
Express-Way-Container 
पिंपरी-चिंचवड

बोरघाटातील वेगच ठरतोय जीवघेणा!

शंकर टेमघरे, शिवनंदन बाविस्कर

पिंपरी - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटातील अवजड वाहनांचे अपघात चिंतेचा विषय झाला आहे. अमृतांंजन पूल आणि ढेकू गावचा उतार हेच प्रमुख ‘ब्लॅक स्पॉट’ अधोरेखित होत आहेत. बोरघाटातील भौगोलिक रचनेमुळे उतारातील तीव्रता कमी करणे अशक्य आहे. त्यामुळे महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलिस आणि आयआरबी यांच्याकडून घाटात आवश्यक ते सर्व उपाय करून झाले असून, अवजड वाहनचालकांकडून अनियंत्रित वेग हा एकमेव मुद्दा सध्या जीवघेणा ठरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून द्रुतगती मार्गावरील अपघात कमी होत आहेत.

२०१०-२०११ मध्ये मुंबईकडे जाताना फूडमॉल (ढेकू) आणि बऊर ते ओझर्डे असे दोन मोठे ब्लॅक स्पॉट होते. हे दोन्ही स्पॉट अतिवेगामुळे होत आहेत. त्यानंतरच्या काळात वाहतूक पोलिसांनी बऊरजवळ स्पीडगन कार्यान्वित करत ओव्हरस्पीड वाहनांवर कारवाई सुरू केली. तसेच, वेगनियंत्रणासाठी निरनिराळ्या माध्यमातून जनजागृती केली. त्यातून येथील अपघाताला ब्रेक लागला आहे. गेल्या वर्षभरात अपवादात्मक परिस्थितीत या ठिकाणी अपघात झाले. त्यामुळे येथील ब्लॅक स्पॉट राहिला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मात्र, बोरघाटातून मुंबईकडे जाताना अतितीव्र उतारामुळे अवजड वाहनांचे नियंत्रण सुटून सातत्याने अपघात होत आहेत. लॉकडाउनच्या काळात वाहतुकीसाठी अडचणीचा असलेला अमृतांजन पूल पाडण्यात आला. त्याचा फायदा म्हणजे तेथे होणारी कोंडी कमी झाली. मात्र, उतारावरून होणारे अपघात कमी होत नाहीत. 

गेल्या वर्षभरात अवजड वाहनांचे अपघात बोरघाटातच अधिक होत आहेत. अवजड वाहनचालक बोरघाटात इंधन वाचविण्यासाठी वाहन न्यूटल करतात. त्यामुळे वेग वाढल्यानंतर वाहन केवळ ब्रेकवर नियंत्रित होत नाही. परिणामी पुढील गाडीला धडकून किंवा वाहन उलटून अपघात होत आहेत. त्यात मनुष्यहानी होत आहेत.

रस्ते विकास महामंडळ, वाहतूक पोलिस आणि आयआरबी यांनी एकत्रित बोरघाटातील सर्वेक्षण करून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. स्पॉटनिहाय स्पीडच्या सूचना, आवश्यक तेथे रिफ्लेक्टरचा वापर करून वाहनचालकांना अधिक सजग करण्याचा प्रयत्न केला आहे. ढेकू येथील उताराची भौगोलिक रचना तशीच असल्याने तेथील उताराची तीव्रता कमी होणार नाही. त्यामुळे तेथे वेगावर नियंत्रण हाच एकमेव मार्ग उरतो. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक पोलिस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

द्रुतगतीवर वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याने अपघात होत आहेत. अवजड वाहनांनी बोरघाट उतरताना पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरमध्ये वाहन चालवावे, जेणेकरून वेगावर नियंत्रण राहील. तसेच, अन्य मार्गावर वळणांवर वाहनांनी वेग कमी करावा, त्यामुळे गाडीचा टायर फुटणार नाही किंवा वाहनांवरील नियंत्रण जाणार नाही. शिवाय, सोमाटणे आणि पनवेल एक्झिटला वळणाऱ्यांनी आपले वाहन तीन-चार किलोमीटर आधीच तिसऱ्या लेनवर चालवावे, जेणेकरून बाहेर पडणे सोपे जाईल. त्यातून अपघाताचा धोकाही राहणार नाही.
- संजय जाधव, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : योगी आदित्यनाथ यांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, काँग्रेसची जिझिया कर लावण्याची इच्छा

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

Car Maintenance Tips: कारची 'अशी' घ्या काळजी, अन्यथा लागेल गंज

Juice For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी प्यायलाच हवेत 'हे ज्यूस, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

SCROLL FOR NEXT