Shalva and Shreya shares their Muhurta photos on social media 
Premier

Shalva Kinjawadekar : अभिनेता शाल्व किंजवडेकर 'या' महिन्यात होणार विवाहबद्ध

Actor Shalva Kinawadekar getting married on this month : अभिनेता शाल्व किंजवडेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर त्याच्या लग्नमुहूर्त समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Shalva Kinjawadekar : झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोहोचला. सोशल मीडियावरसुद्धा शाल्व लोकप्रिय असून त्याच्याविषयीची अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मालिकेतील त्याची आणि अन्विताची जोडीही चांगलीच लोकप्रिय झाली होती.

२०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात शाल्वने त्यांची गर्लफ्रेंड श्रेया डफलापूरकरसोबत साखरपुडा केला. ते बराच काळ एकमेकांना डेट करत आहेत. शाल्वच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांच्या साखरपुड्यानंतर तो आणि श्रेया लग्न कधी करणार याची चर्चा बराच काळ सोशल मीडियावर रंगली होती. पण अखेर त्यांच्या लग्नाविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलं आहे.

'राजश्री मराठी'ने दिलेल्या बातमीनुसार शाल्व आणि श्रेया डिसेंबर २०२४ मध्ये लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारी सुरु झाली असून नुकतंच त्यांच्या लग्नाच्या तयारीचा मुहूर्त थाटात पार पडला. श्रेया आणि शाल्व दोघेही कामात बिझी असल्याने आणि त्यांच्या लग्न मुहूर्त लवकर करण्यात आला. पण ते अजून त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली नाहीये. सोशल मीडियावर त्यांच्या मुहूर्ताचे फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहेत.

१२ फेब्रुवारी २०२३ या शाल्व आणि श्रेयाने साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याला इंडस्ट्रीतील सगळ्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले होते.

शाल्वची होणारी बायको श्रेया ही स्टायलिस्ट असून ती तलम, तलम ऍक्सेसरीज आणि हाऊस ऑफ तक्षी या ब्रॅंड्सची मालक आहे. ती ब्रँड्सच्या अंतर्गत साड्या, दागिने आणि मुलांसाठीचे कपडे डिझाईन करते. आजवर अनेक सेलिब्रिटीजच्या लग्नातील आऊटफिटचं स्टायलिंग श्रेयाने केलं आहे. याशिवाय सोशल मीडियावरील तिचे स्वतःचे फोटोशूट्ससुद्धा खूप चर्चेत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात, सेन्सेक्सने ओलांडला 81,430 चा टप्पा, निफ्टीतही मोठी वाढ

"दुसऱ्याचं घर फोडलं...!" स्मिता पाटीलच्या आईचा राज बब्बरसोबतच्या लग्नाला होता तीव्र विरोध! म्हणाल्या... 'तु तर होमब्रेकर...'

Hyderabad Gazette : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करा: मिथुन राठोड यांची मागणी; १७ सप्टेंबरला सोलापुरात मोर्चा

Gold Rate Today : सोन्याने रचला इतिहास, एका दिवसात ५ हजारांची वाढ, चांदीही तेजीत; जाणून घ्या आजचा ताजा भाव

चाकाखाली लिंबू ठेवला, मी चालवणार म्हणत तरुणीने स्टेअरिंग घेतलं हातात; नवी कोरी थार पहिल्या मजल्यावरून कोसळली, Video Viral

SCROLL FOR NEXT