Step father found guilty in Laila Khan murder case esakal
Premier

Laila Khan Murder Case : १३ वर्षांनंतर मिळाला न्याय ! अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी सावत्र वडिलांना होणार शिक्षा

Laila Khan Murder Case : 2011 साली झालेल्या अभिनेत्री लैला खान हत्याप्रकरणात न्यायालयाने तिच्या सावत्र वडिलांना दोषी ठरवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Laila Khan: 2011 साली झालेल्या अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटूंबियांच्या हत्या प्रकरणात तिच्या सावत्र वडिलांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तब्बल १३ वर्षानंतर लैला खान आणि तिच्या कुटूंबाला न्याय मिळाला आहे. बॉलिवूडमध्ये बी आणि सी ग्रेडच्या फिल्म्समध्ये काम करणाऱ्या लैलाची आणि तिच्या कुटूंबाची तिच्या सावत्र वडिलांनी निर्घृणपणे हत्या केली होती. लैलाचं वय यावेळी फक्त ३० वर्षं होतं. या प्रकरणानंतर खुनी असलेल्या परवेझ टाकला अटक करण्यात आली आणि तब्बल १२ वर्षं तो जेलमध्ये होता.

येत्या मंगळवारी परवेझला शिक्षा सुनावण्यात येणार असून परवेझ टाकला जास्तीत जास्त फाशी तर कमीत कमी जन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

२०११ साली परवेझ टाक याने लैला खान आणि तिच्या कुटूंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्महाउसमध्ये हत्या केली होती आणि त्यांचे मृतदेह याच फार्महाऊसमध्ये गाडले होते. परवेझ हा लैलाच्या आईचा तिसरा नवरा होता आणि त्याचं वय त्यावेळी २९ वर्षं इतकं होतं. लैलाचे पिता नादिरशाह पटेल यांनी लैला आणि तिच्या आईसोबत कुटूंबातील आणखी चार सदस्य बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्यानंतर हा हत्येचा प्रकार उघडकीस आला.

शेहलिना खान (59), त्यांची मोठी मुलगी अजमीना पटेल (32), दुसरी मुलगी लैला (30),जुळी मुलं झारा आणि इम्रान (25) आणि अजून एक नातेवाईक रेश्मा सगीर खान उर्फ ​​टल्ली (19) यांची हत्या परवेझने केली होती आणि त्यांचे मृतदेह त्याचं फार्महाऊसमध्ये गाडून टाकले होते.

'या' कारणामुळे संपवलं लैलासहित तिचं कुटूंब

दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने रागाच्या भरात हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलंय. याशिवाय लैलाच्या आईचे तिचा दुसरा पती आसिफ शेखसोबत जवळीक वाढली होती. ही गोष्ट परवेझला पसंत नव्हती म्हणून त्याने हत्या केली असंही म्हंटलं गेलं होतं.

टाकने दिलेल्या जबानीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. ८ फेब्रुवारीला टाक लैलाच्या कुटूंबासहित इगतपुरी येथील फार्महाऊसवर पार्टी करण्यासाठी गेला होता. या दरम्यान मध्यरात्री लैलाची आई आणि टाकमध्ये भांडण झालं. हे भांडण सुरु असतानाच टाकने शेहलीना खानच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यामुळे शेहलीना यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून घरातील इतर लोक जागे झाले आणि ते टाकला मारहाण करू लागले. तेव्हा टाकने मदतीसाठी चौकीदार असलेल्या शाकीर हुसेनला आवाज दिला आणि त्या दोघांनी मिळून संपूर्ण कुटूंबाची हत्या केल्याचं जबानीत कबूल केलं.

मुंबई उत्तर-मध्यचे भाजपचे उमेदवार उज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून ही केस लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी जाहीर होताच लैला खान हत्या प्रकरणासह एकूण २९ खटल्यांचा निकमांनी राजीनामा दिला होता.

कोण होती लैला खान?

2002 मध्ये कन्नड फिल्म 'मेकअप' मधून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. पण तिला ओळख मिळाली ते राजेश खन्ना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'वफा : ए डेडली लव स्टोरी' या सिनेमातून. 2008 साली रिलीज झालेला हा सिनेमा फ्लॉप झाला असला तरीही या सिनेमातील राजेश खन्ना आणि लैला खान यांच्यावर चित्रित झालेले बोल्ड सीन्स गाजले होते. या सिनेमानंतर तिने सी ग्रेड सिनेमांमध्ये काम करणं सुरु केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Riots 2002 : गुजरात दंगलीतील तीन आरोपींची २३ वर्षांनी निर्दोष मुक्तता; अनेक साक्षीदारांचा मृत्यू , पुरावे गायब, तपास अधिकारीही...

धक्कादायक घटना! 'कुळकजाईत एकाचा खून'; मृतदेह शेतात नग्नावस्थेत, माण तालुक्यात उडाली खळबळ; नेमकं काय घडलं..

पोलिस भरतीत एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन! अर्जासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत; पहिल्यांदा मैदानी‌ नंतर एकाचवेळी लेखी परीक्षा; परीक्षेबद्दल वाचा सविस्तर...

Satara Woman Doctor Case:' फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने बडतर्फ'; असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूकचा ठपका

JEE, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांचा खर्च राज्य शासन भरणार; कशी होणार निवड?

SCROLL FOR NEXT