Fashion designer Sabyasachi graced his presence at Met Gala Red Carpet 
Premier

Met Gala 2024 : सब्यासाचीने रचला इतिहास ; मेट गाला रेड कार्पेटवर लावली खास अंदाजात हजेरी

Fashion designer Sabyasachi graced his presence at Met Gala Red Carpet : फॅशन डिझायनर सब्यासाची मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारा पहिला भारतीय डिझायनर ठरला. सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा लाडका फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जीला मेट गाला २०२४ च्या रेड कार्पेटवर हजेरी लावण्याचा बहुमान मिळाला. मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजर राहणार तो इतिहासातील पहिला भारतीय फॅशन डिझायनर ठरला आहे. त्याच्या उत्तम डिझाईन्ससाठी तो जगभर विख्यात आहे.

६ मे ला न्यूयॉर्क मधील मेट्रोपॉलियन म्युझियम ऑफ आर्टमध्ये पार पडलेल्या मेट गाला फेस्टिव्हलला त्याने खास अंदाजात हजेरी लावली. सोशल मीडियावर त्याचा लूक चर्चेत आहे.

या वेळेची मेट गाला ची थीम 'गार्डन ऑफ टाईम' अशी होती आणि या थीमनुसार त्याने केलेला लूक सध्या सोशल मीडियावर गाजतो आहे. व्हाईट शर्ट, ट्राऊझर, डस्टर कोट आणि त्यावर राजेशाही ज्वेलरी या लूकमध्ये सब्यासाची स्टनिंग दिसतोय.

सोशल मीडियावर त्याने या लूकमधील फोटो शेअर केले आणि त्याला "यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण आणि एकसमानतेची सरपटणारी गर्दी जसजशी जवळ येत आहे त्यात ही फक्त कलाकुसर आहे जी मानवी स्पर्श, परंपरा आणि विविधतेचे मूर्त स्वरूप असून काळाच्या ओघात संस्कृतीचे रक्षण करेल." असं कॅप्शन दिलं आहे.

त्याने घातलेलं पांढरं शर्ट त्यावरील बेज रंगाची मॅचिंग ट्राउझर आणि त्याला साजेल असा बेल्ट लक्ष वेधून घेतोय. पण त्याचा लूक उठावदार झालाय तो त्याने त्यावर घातलेल्या कॉटन डस्टर कोटमुळे जो २०२४ मधील सब्यासाची कलेक्शनचा भाग आहे. या कॉटवर फुलांची एम्ब्रॉयडरी असून सोनेरी रंगाची सिक्वेन्स बॉर्डर विणण्यात अली आहे. त्याने गळ्यात घातलेल्या मोती, माणिक आणि हिऱ्यांच्या शाही माळांमुळे हा लूक आणखी उठावदार झाला असून मेट गालाच्या थीमला शोभून दिसतोय. हा लूक पूर्ण करण्यासाठी त्याने सनग्लासेस आणि ब्राऊन रंगाचे लोफर फुटवेअर घातले आहेत त्यामुळे तो खूपच स्टायलिश दिसतोय.

सब्यासाचीने अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालामध्ये नेसलेली साडी डिझाईन केली होती. जुनी परंपरा आणि आधुनिकतेचं मिश्रण असलेली ही साडी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. १६३ कारागिरांनी १९६५ तास काम करून ही साडी तयार केली आहे. सब्यासाचीच्या डिझाईनचं सगळीकडेच कौतुक होतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST 2.0: जीएसटी शून्य केला, तरीही विमा महागणार? नव्या अहवालामुळे सर्वसामान्य ग्राहक चिंतेत

Maratha-OBC Reservation : आरक्षणाचा वाद पेटविण्याचा सरकारचा डाव : रोहित पवार

Prajwal Revanna Jail Job : माजी पंतप्रधानांचा बलात्कारी नातू आता पुस्तकं वाटणार; तुरुंगात मिळाली लायब्ररी क्लार्कची नोकरी, रोज मिळणार 'इतका' पगार

Lingayat Community : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, सर्वोच्च संस्थेच्या आवाहनाने राजकारणात खळबळ

US Open 2025 : कार्लोस अलकाराजने जिंकला सहावा ग्रँड स्लॅम, जागतिक क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानी

SCROLL FOR NEXT