snake in bigg boss ott 3 house sakal
Premier

Bigg Boss OTT 3: घरात दिसला लांबलचक साप; नेटकऱ्यांची भीतीने उडाली गाळण, वाचा नेमका कुठे आहे बिग बॉसचा सेट?

Snake Inside Bigg Boss OTT 3 House: 'बिग बॉस ओटीटी ३' च्या घरात नेटकऱ्यांना साप दिसला आहे.

Payal Naik

Bigg Boss OTT 3 Fans Spot Black Snake Inside House: सध्या 'बिग बॉस ओटीटी ३' सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे हा सीझन चाहत्यांच्या पसंतीस उतरतोय. टास्कपेक्षाही इथे आलेल्या स्पर्धकांची वैयक्तिक आयुष्य आणि इथे होणारी भांडणं सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कार्यक्रमात आलेल्या अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी यापूर्वी चर्चेत होत्या. नुकतंच अरमानने विशालला कानशिलात लगावल्याचं प्रकरण तापलेलं असताना आता बिग बॉसच्या घरात एक मोठी गडबड दिसून आली आहे. घरातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बिग बॉसच्या घरात साप दिसला आहे.

'बिग बॉस ओटीटी ३' चं लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर सुरू असतं. या कार्यक्रमाच्या लाइव्ह फीडमध्ये असं चक्क साप दिसल्याने नेटकरीही घाबरले आहेत. घरातील स्पर्धकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये बिग बॉसच्या घरात मोठा साप फिरताना दिसून आला. या व्हिडिओत लवकेश कटारियाचा हात बांधला असून तो एके ठिकाणी बसलेला दिसत आहे. तर त्याच्या पाठीमागूनच हिरव्या गवतावरून एक काळ्या रंगाचा साप सरपटताना दिसत आहे. लवकेशला या गोष्टीचा जराही अंदाज नाहीये की त्याच्या बाजूने एक मोठा साप गेला आहे.

कुठे आहे बिग बॉसचा सेट?

यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्हाला स्पर्धकांच्या जीवाची काही पर्वा आहे की नाही? त्यांच्या जीवाशी तुम्ही खेळ करताय? एवढा मोठा साप तिथे आहे आणि कुणाचंही लक्ष कसं नाही? साप घरात येऊच कसा शकतो? बिग बॉसमध्ये सुरक्षा नावाची काही गोष्ट आहे की नाही? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. 'बिग बॉस ओटीटी ३' चा हा सेट मुंबई फिल्मसिटी येथे आहे. गेले २ दिवस पडत असलेल्या पावसामुळे निवाऱ्यासाठी हा साप घरात घुसला असल्याचा अंदाजही लावण्यात येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT