फ्रान्समध्ये सलग चार दिवस मानवी तस्करीच्या संशयातून २७६ भारतीय असलेले विमान थांबवून ठेवण्यात आले होते.
फ्रान्समध्ये सलग चार दिवस मानवी तस्करीच्या संशयातून २७६ भारतीय असलेले विमान थांबवून ठेवण्यात आले होते. esakal
प्रीमियम ग्लोबल

Real Life Dunki : 'डंकी' चा मुद्दा भारतात का गाजतोय?

Shraddha Kolekar

मुंबई : फ्रान्समध्ये सलग चार दिवस मानवी तस्करीच्या संशयातून २७६ भारतीय असलेले विमान थांबवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे विमान मंगळवारी २६ डिसेंबरला मुंबईत पाठविण्यात आले.

या घटनेमुळे मानवी तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २१ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपट याच विषयावर आधारलेला आहे.

डंकी चित्रपटात काय?

शाहरुख खानने अभिनय केलेल्या डंकी या चित्रपटात राजकुमार हिराणीने चार मित्रांची गोष्ट सांगितली आहे. या चारही मित्रांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी परदेशात जायचे असते. मात्र त्यांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळत नाही.

त्यावेळी ते या 'डंकी रूट' चा वापर करतात. या दरम्यान त्यांना येणाऱ्या अडचणी आणि एकूणच त्यांचा डंकी प्रवास याबद्दल चित्रण आहे.

डंकी म्हणजे काय?

डंकी हा पंजाबी शब्द असून याचा अर्थ होतो एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा विश्वास. या शब्दाचा अर्थ 'डॉंकी रुट' या शब्दावरून आले आहे. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात बेकायदेशीरपणे घुसखोरी करणे.

अनेक देशांच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशमार्गे अमेरिकेसारख्या देशात प्रवेश करणे. हा मार्ग बेकायदेशीर असल्याने यात अनेक आव्हाने असतात. कठीण रस्ते, जंगल, नदी अशा सगळ्या गोष्टींना पार करत सीमा सुरक्षा मोडून प्रवेश करावा लागतो.

अनेकजण बेकायदा स्थलांतरणाचा पर्याय का निवडतात?

अनेकांना आहे त्यापेक्षा चांगलं आयुष्य दुसऱ्या देशात जाऊन जगण्यासाठी स्थलांतर करायचे असते. तसेच काहींना दुसऱ्या देशात जाऊन अधिक पैसे कमवायचे असतात परंतु त्या देशाकडून त्यांना व्हिसा (म्हणजेच त्या देशात जाण्यासाठीची कायदेशीर परवानगी) मिळतेच असे नाही. त्यावेळी अनेकजण अशा प्रकारे बेकायदेशीर पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात.

अनेक केसेसमध्ये मानवी तस्करी, बेकायदेशीर कामे करण्यासाठी एजंटच्या माध्यमातून अनेक लोक असा बेकायदेशीर मार्ग स्वीकारतात. यासाठी लाखो रुपये एजंटला देऊन बनावट कागदपत्र बनवून, खोटी करणे सांगून दुसऱ्या देशात जातात. हा प्रवास करायला अनेक महिने जातात तसेच काहींना जीवही गमवावा लागतो.

अवैध धंदे आणि मानवी तस्करीच्या प्रकारांचा स्थलांतरणाशी संबंध कसा?

अमली पदार्थांना अनेक देशामंध्ये बंदी आहे. या पदार्थांची एका देशातून दुसऱ्या देशात तस्करी या स्थलांतर करणाऱ्यांच्या माध्यमातून केली जाते. त्यासोबतच सोने किंवा अनेक महागड्या वस्तू अवैध पद्धतीने या मार्गे नेल्या जातात.

सेक्स वर्कसाठी महिला, चुकीच्या कामांसाठी लहान मुलांची तस्करी या प्रकारांसाठी मानवी तस्करी केली जाते. यासाठी अनेक एजंटची साखळी असून त्यांचे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असते.

बेकायदेशीर स्थलांतराची आकडेवारी लाखोंच्या घरात..

युएस मधील कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन विभागाच्या आकडेवारीनुसार जवळपास ९७ हजार भारतीय नागरिक बेकायदेशीर स्थलांतर करताना पकडले गेले आहेत. ही आकडेवारी २०१९ च्या तुलनेत पाच पटीने वाढली आहे.

२०१९ - २० मध्ये ही संख्या २० हजारच्या आसपास होती. २०२०-२१ मध्ये ३१ हजाराच्या आसपास, २०२१-२२ मध्ये जवळपास ६४ हजार आहे.

मानवी तस्करीबाबत भारतात गुण्यांची नोंद कमीच

मानवी तस्करी होत असलेल्या भारतीयांची आकडेवारी अधिक असल्याचे युएस सरकारने सांगितले असले तरीही तुलनेने भारतात गुण्यांची नोंद होताना दिसत नाही. याबाबत युएसने काहीच महिन्यांपूर्वी अहवाल सादर करत याबाबतची माहिती दिली होती.

या रिपोर्टमध्ये मानवी तस्करी करणाऱ्यांमधील ८९ टक्के लोकांना सोडून दिलं जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जिथे यूएस सरकार एक लाखाच्या जवळपास आकडेवारी सांगते आहे तिथे भारतात गुन्ह्यांची नोंद ही केवळ दोन ते अडीच हजारापर्यंतच नोंदविण्यात आली आहे.

----------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT