कुठलं होम लोन फायदेशीर Esakal
Home Loan

Home Loan चे विविध प्रकार तुम्हाला माहित आहेत का? हे गृहकर्ज ठरू शकतं फायदेशीर

घरासाठी बँकेतून कर्ज घ्यायचं म्हंटलं तर अनेकांना केवळ Home loan एवढाच शब्द ठाऊक असतो. मात्र हे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही बँकाकडून घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या विविध गृहकर्जाची माहिती घेणं गरजेचं आहे

Kirti Wadkar

स्वत:च सुंदर घरं असावं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मात्र सध्याच्या महागाईमुळे घर किंना फ्लॅट खरेदी करणं हे प्रत्येकासाठी एक मोठा आव्हान ठरतंय. तसचं बांधकाम वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे स्वत:च घर बांधणं तर त्याहून खर्चिक ठरू लागलं आहे. Home Buying which loan will give more benefits

यासाठीच मग अनकेजण गृहकर्ज Home Loan घेऊन घराचं स्वप्न पूर्ण करतात. होम लोनमुळे तुम्हाला घरासाठी लागणारी मोठी रक्कम एकत्र करणं शक्य होतं. सध्याच्या घडीला जवळपास सर्वच बँका Banks त्यांच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारची गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

खरं तर घरासाठी बँकेतून कर्ज घ्यायचं म्हंटलं तर अनेकांना केवळ Home loan एवढाच शब्द ठाऊक असतो. मात्र हे कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही बँकाकडून घर खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या विविध गृहकर्जाची माहिती घेणं गरजेचं आहे.

गृहकर्जाचे विविध प्रकार आहेत. यातील कोणता प्रकार तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तसंच तुम्हाला किती कर्ज मिळू शकतं याची माहिती मिळाल्यास तुम्हाला योग्य घरं खरेदी करणं सोप होवू शकतं. होम लोनमध्ये जास्त प्रचलित किंवा मोठ्या प्रमाणावर घेतलं जाणाऱ्या लोनमध्ये घर खरेदीसाठी आणि घरं बांधण्साठी असे दोन मुख्य लोन आहेत.

घर खरेदीसाठी गृहकर्ज

मोठ्या प्रमाणात घेतलं जाणारं कर्ज म्हणजे घर खरेदीसाठी घेतलं जाणारं होम लोन. यामध्ये साधारण फ्लॅट, अपार्टंमेंट किंवा बंगला अशी तयार मालमत्ता किंवा घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतलं जातं. साधारण घराच्या किमतीच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत होम लोन बँकांकडून दिलं जातं. Basic Home Loan

यासाठी कर्जाची पात्रता पाहून तसचं सिबिल स्कोर, उत्पन्न अशा अनेक बाबींचा विचार करून बँक गृह कर्ज मंजूर करते. त्यानंतर कर्जदाराला दरमहा EMI स्वरुपात हे कर्ज फेडावं लागतं.

हे देखिल वाचा-

घर बांधण्यासाठी होम लोन

अनेकजण फ्लट किंवा तयार घर खरेदी करण्याएवजी स्वत:च्या आवडीनुसार एखादं घर बांधणं पसंत करतात. मग तो एखादा बंगला असो किंवा एखादं छोटीखानी बैठं घर असो. अशावेळी देखील घर बांधकामासाठी लाखोंच्या घरात खर्च येतो.

यासाठी बँका होम क्नस्ट्रक्शन लोन Home Construction Loan देतात. अर्थाच घर बांधण्यासाठी बिल्डर किंवा सामानासाठी एकाच वेळी मोठी रक्कम लागणार असल्याने बँक बांधकामाच्या टप्प्यांनुसार मोठी रक्कम देत असते.

घर वाढवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्ज

जर तुमच्याकडे आधीपासूनच एखादं घरं असेल मात्र जर तुम्हाला या घराचा विस्तार करायचा असेल म्हणजे एखादा मजला आणखी वाढणं किंवा काही खोल्या वाढवणं अशावेळी देखील बँक तुम्हाला कर्ज देत असते.

तसचं घराची दुरुस्ती करणं किंवा रिनोव्हेशन करण्यासाठी देखील तुम्ही बँकेकडून improvement loan घेऊ शकता.

या काही महत्वाच्या कर्जांसोबत बँक होम लोन बॅलेन्स ट्रान्सफर तसचं NRI Home Loans ची सुविधा देखील पुरवतात.

तुम्ही किती होम लोन घेऊ शकता?

साधारणपणे अनेकजण एकावेळी एकच गृहकर्ज घेतात. मात्र काही बाबतीत काही जण एकावेळी दोन गृहकर्ज घेऊ शकतात. अर्थात यासाठी तुमचा क्रेडिट स्कोर आणि उत्पन्न किती आहे हे पाहिलं जातं. तर तुमचं उत्पन्न चांगलं असेल आणि तुमच्यात दुसरं कर्ज फेडण्याची देखील क्षमता असल्याचं बँकेने पडताळल्यास बँक तुम्हाला दुसरं होम लोन देखील देते.

त्याचप्रमाणे तुम्ही एक गृहकर्ज घेतलं असेल आणि तुम्हा आणखी एका गृहकर्जाची आवश्यकता भासल्यास तुम्ही कुटुंबातील इतर व्यक्तीसोबत जॉइंट होम लोनदेखील घेऊ शकता. म्हणजे पती-पत्नी किंवा वडील-मुलगा असं जाॅईंट लोन बँक देते.

हे देखिल वाचा-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT