bhama askhed.jpg
bhama askhed.jpg 
पुणे

खेड, शिरुरकरांसाठी भामा आसखेड धरणबाबत महत्त्वाची बातमी 

सकाळवृत्तसेवा

आंबेठाण (पुणे) : शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आणि पाण्यात उतरून लहान मुले, महिला, वृद्धांसह सुरू असलेले आंदोलन यामुळे सर्वांचे लक्ष लागेलेले भामा आसखेड धरण भरण्याच्या मार्गावर आहे. खेड तालुक्यासह शिरूर आणि दौंड तालुक्याला वरदान ठरणाऱ्या भामा आसखेड धरणात सध्या (दि. २१) सकाळी सहा वाजेपर्यंत ७८. ५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा अत्यंत कमी असून मागील वर्षी आजच्या दिवशी धरण शंभर टक्के भरले होते.

यावर्षी धरण भरण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांसह या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शहरी भागातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सुरुवातीला धरण भरणार की नाही याची नागरिकांना धास्ती वाटत होती परंतु पाऊस असाच सुरू राहिला तर धरण भरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भामा आसखेड धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी आहे.

खेडच्या पश्चिम भागात भामा आसखेड हे मातीचे धरण आहे. चालू वर्षी एक जूनपासून धरण क्षेत्रात ६१५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर काल दिवसभरात १९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. धरणात सध्या ६.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे तर जिवंत पाणीसाठा हा ६.०२ टीएमसी इतका आहे.
धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौड या तीन तालुक्यांना होत असतो. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांना वरदान ठरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT