traffic.jpg
traffic.jpg 
पुणे

तब्बल दोन महिन्यानंतर पुण्यात झाले ट्रॅफिक जॅम; तुमच्या रस्त्यावर काय परिस्थिती पाहा

सकाळवृत्तसेवा

पुणे : आज खऱ्या अर्थाने असे वाटले की पुणे शहरातील जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु होत आहे. कारण गेल्या दोन महिण्यांपासून चिटपाखरूही नसणाऱ्या शहरातील रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी दिसून आली. अनेक रस्त्यांवर ट्रॅफिक झाल्याचे दिसून येत आहे.

शहरातील सिंहगड रस्ता, कात्रज रस्ता, स्वारगेट चौक, सेनापती बापट रस्ता, गोखले रस्ता, विद्यापीठ रस्ता या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी होत आहे. आत्ता सांयकाळी देखील शहरातील अनेक रस्त्यांवर गर्दी होताना दिसून येत आहे. 2 दिवसांपुर्वी अनेक रस्त्यांवरील सिग्नल देखील सुरु करण्यात आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कायमच गतीमान असणाऱ्या या शहराचे जनजीवन पुन्हा सुरळीत होत आहे. यावेळी काही नागरिक कोरोना संसर्गापासून बचावासाठी काळजी घेताना दिसून येत आहेत. मात्र काही नागरिक कसलीही फिकीर न करता फिरतानाही दिसत आहेत. 

फेब्रुवारी महिण्यात कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्यास सुरवात झाली. त्यानंतर त्याचा फैलाव मार्च महिण्यात वाढला. या कारणास्तव महाराष्ट्रात राज्य सरकारने लाॅकडाउन जाहीर केला. त्यानंतर केंद्र सरकारने संपुर्ण देशातच लाॅकडाउन जाहीर केला. त्यानंतर पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये, दुकाने, सर्वच गोष्टी बंद करण्यात आल्या. यामुळे जीवनमान ठप्प झाले. रस्ते ओस पडले. नागरिक रस्त्यावर यायला दे्खील घाबरू लागले. या सर्वच कारणांमुळे कायमच गर्दीने व ट्रॅफिकने गजबजलेले शहरातील रस्ते देखील ओस पडले होते.  

आज मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात व्यापारी पेठांच्या भागातील जवळपास 80 टक्के व्यापार सुरू झाला असल्याचे चित्र होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सकाळापासूनच रस्त्यावर वर्दळ सुरू होती. गेली दोन महिने बंद असलेल्या सिग्नल यंत्रणाही सुरू झाल्यामुळे डेक्‍कन जिमखाना, जंगली महाराज रस्ता, भांडारकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक,शिवाजी रस्ता, सिंहगड रस्ता मंडईचा परिसर या नेहमीच्या वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात गर्दी दिसत होती.

दरम्यान, आठवड्याचा आज पहिला दिवस असल्याने बॅंकांपुढे नागरीकांची गर्दी होती. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी दिसत होती. दुकानांमध्येही येणाऱ्या ग्राहकांना सोशल डिस्टसिंगचे नियम पाळूनच आत घेतले जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहवयास मिळाले. प्रतिबंधित क्षेत्रातही आज सकाळी मोठ्या प्रमाणावर नागरीक घराबाहेर पडल्याचे चित्र पहावास मिळाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT