Court
Court 
पुणे

न्यायालयात अंतिम टप्प्यातील खटले निकालाच्या प्रतीक्षेत

सकाळवृत्तसेवा

पुणे - माझ्या पक्षकाराविरोधात २०१५ पासून बाललैंगिक अत्याचाराचा खटला सुरू आहे. २०१९ च्या सुरवातीला साक्षी-पुरावे पूर्ण झाले आहेत. आता प्रकरण निकालाच्या टप्प्यात आहे; मात्र गेल्या आठ महिन्यांपासून त्यावर निकाल देण्यात आला नाही. त्यामुळे आपल्याला शिक्षा होणार की निर्दोष मुक्तता, अशी धाकधूक त्याच्या मनात असल्याचे ॲड. अमोल डांगे यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्या दाव्यावर सुनावणी घ्यायची, याची सूचना उच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. निकालाच्या टप्प्यात असलेल्या प्रकरणांवर निर्णय द्यावा, असे त्यात नमूद आहे; मात्र इतर तत्काळ प्रकरणांच्या रेट्यात निकालाच्या प्रतीक्षेत असलेले खटले दुर्लक्षित झाले असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जर नियमित कामकाज सुरू झाले, तर त्याचे नियोजन कसे असेल, असा प्रश्‍न वकिलांच्या मनात आहे.

जमिनीच्या अर्जांवर गतीने निकाल दिले जात आहेत. त्याप्रमाणे आता ट्रायलदेखील सुरू करावी. प्रत्यक्ष न्यायालयात येण्यापेक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सचादेखील पर्याय आहे. तसेच आत्ताची कामकाजाची वेळ कमी पडत आहे. ती वाढवणे गरजेचे असल्याचे ॲड. डांगे यांनी सांगितले.

  • न्यायालयात हजर राहण्याबाबत सूचना करण्यात येत नाही 
  • ‘व्हीसी’द्वारे साक्ष नोंदविण्याची मागणी  
  • अंतिम टप्प्यात असलेले खटलेही उशिराने मार्गी 
  • निकाल झाला नसलेले पक्षकार अडकून  
  • न्यायालयीन कामकाजाची वेळ वाढविण्याची मागणी 

नोव्हेंबर अखेरपर्यंत सध्या आहे त्याच पद्धतीने न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी उच्च न्यायालय आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांची २५ नोव्हेंबरला बैठक आहे. १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने नियमित सुनावणी सुरू करण्याची आमची मागणी आहे. फौजदारी खटल्यांत काही प्रमाणात सुनावणी होत आहे; मात्र दिवाणी दाव्यांवर मोठा परिमाण झाला आहे. 
- ॲड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT