Rumors 
पुणे

सावधान! तुम्ही आहात आता पोलिसांच्या रडारवर; कारण वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - तुम्ही ‘सोशल मीडिया’ वापरत असाल तर सावधान! या प्लॅटफॉर्मवर कुठला मेसेज किंवा व्हिडिओ टाकत असाल, तर तो चुकीचा किंवा आक्षेपार्ह नाही ना, याची आधी खात्री करा. कारण असे मेसेज व्हायरल करून अफवा पसरविणारे सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या अफवाखोरांवर सायबर पोलिसांच्या ‘सोशल मीडिया लॅब’ची नजर राहणार आहे. असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे पोलिसांनी ‘सोशल मीडिया’वरील आक्षेपार्ह अडीच हजार पोस्ट आत्तापर्यंत काढून टाकल्या आहेत.

चिकन, मटण, मासे खाल्ल्याने कोरोना होतो, असा सांगणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी ‘सोशल मीडिया’वर व्हायरल करण्यात आला होता. ही अफवा पसरविणाऱ्यांच्या मुसक्‍या पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आवळल्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा अशा अफवेच्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. या प्रकाराची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. 

मागील काही दिवसांपासून कधी पुण्यात मेट्रो पूल पडल्याचा, तर कधी पुण्यातील रविवार पेठेत वृद्धांना कोरोनाच्या नावाखाली लुटल्याचा व्हिडिओ, छायाचित्रे व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत होते. त्यातूनच पोलिसांनी अशा अफवा पसरविणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

काय करते ‘सोशल मीडिया लॅब’?  
सायबर पोलिसांची ‘सोशल मीडिया लॅब’ फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप अशा ‘सोशल मीडिया’वरील चुकीचे, आक्षेपार्ह, बदनामीकारक मेसेज, छायाचित्रे, व्हिडिओंवर बारकाईने लक्ष ठेवते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून आक्षेपार्ह पोस्ट लॅबकडून डिलीट केल्या जातात. त्याचबरोबर आक्षेपार्ह व चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते. लॅबने फेसबुकवरील २३२८, इन्स्टाग्रामवरील ४३ व ट्‌विटरवरील १८ अशा २३८९ पोस्ट काढून टाकल्या आहेत.

सोशल मीडिया’वर अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे, त्यासाठी सायबर पोलिसांच्या ‘सोशल मीडिया लॅब’द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. असे प्रकार करणारे बहुतांश लोक अन्य राज्यांतील आहेत.
- संभाजी कदम, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT