The boy lost eye eyesight due to not getting proper treatment in time in the lockdown 
पुणे

लॉकडाऊनने हिरावली 'त्याची' दृष्टी

सकाळवृत्तसेवा

पुणे : जेमतेम पंधरा वर्षांच्या मुलाच्या डोळ्यांना लॉकडाऊनमध्ये झालेली इजा आता त्याच्या अंधत्वाच कारण ठरत आहे. लॉकडाऊन म्हणजे इमर्जन्सी सेवा बंद, दवाखाने बंद असा अर्थ होत नाही. हा या बातमीचा थेट संदेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

पुण्यापासून जेमतेम चाळीस-पंचेचाळीस किलोमीटर राहणारं एक त्रिकोणी कुटुंब. पहिले आणि दुसरे लॉकडाऊन काटेकोरपणे आणि स्वयंशिस्तीने पाळणारं हे कुटुंब. पण, तिसऱया लॉकडाऊनच्या सुरवातीच त्या त्रिकोणाचा एक कोन असलेल्या 15 वर्षांच्या मुलाच्या डोळ्याला इजा झाली. घरातून बाहेर पडायचं कसं, बाहेर पडलो तरीही रुग्णालयापर्यंत जायचं कसं, रुग्णालय सुरू असतील का, तेथे डॉक्टर उपचार करतील का की, आधी कोरोनाची चाचणी करतील अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यात पुढचे पंधरा-वीस दिवस गेले. त्यानंतर एकेका प्रश्नाची उत्तरे शोधून वडील आणि मुलगा दवाखान्यात आले. डॉक्टरांनी डोळ्याच्या पडद्याला इजा झाल्याचं सांगितलं. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. पण, यासाठी खूप उशिर झालेला...

Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!

वेळेत उपचाराचे महत्त्व
डोळा हा शरीरातील अत्यंत संवेदनशील अवयव असल्याने त्याच्या उपचारात दिरंगाई केल्यास त्याचा थेट परिणाम दृष्टीवर होतो. डोळ्यांच्या पडद्यांना इजा झाल्यास त्यावर पहिल्या 48 तासांमध्ये उपचार केल्यास 90 टक्के रुग्णांमध्ये चांगला परिणाम दिसतो. उपचारांना उशिर झाल्यास दृष्टी वाचविण्याची शक्यता 50 टक्क्यांपर्यंत कमी होते. त्यामुळे वेळेत उपचार हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. 

पुणे : चांदणी चौकात ऍसिडगळती; वाहतूक वळवली

इमर्जन्सी म्हणजे फक्त जीवरक्षक असं नाही
हृदयविकार, अर्धांगवायू, प्रसूती, अपघात या आणि अशाच काही विकारांनाच फक्त इमर्जन्सी म्हणतात. खरंतर हा एक गैरसमज निर्माण झालेला आहे. कारण, डोळ्याला झालेली इजा ही देखील इमर्जन्सी असते. त्यातून थेट जीवाला धोका नसला तरीही पुढील आयुष्यभराची दृष्टी जाण्याचा धोका निश्चित असतो. त्यामुळे त्याच्यावरही वेळेत अचूक निदान आणि प्रभावी उपचार आवश्यक असतात. 

या रुग्णांनी लॉकडाऊनमध्ये काय केलं?
सामान्यतः नेत्ररुग्णालयात डोळ्याच्या पडद्यांना इजा झाल्याची तक्रार घेऊन दररोज किमान 5 रुग्ण येतात. लॉकडाऊनमध्ये ही संख्या एक ते दोनपर्यंत कमी झाली असल्याचे निरीक्षण नेत्रतज्ज्ञांनी नोंदविले. अशा रुग्णांनी लॉकडाऊनमुळे बाहेर पडणे टाळले, असा एक अर्थ होतो. पण, त्याचा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...

लॉकडाऊनबद्दलचे गैरसमज
-    लॉकडाऊनमध्ये रुग्णालये बंद 
-    रुग्णालयात डॉक्टर नाहीत
-    सर्व शस्त्रक्रिया बंद आहेत
-    डॉक्टर तपासत नाहीत


- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट 

''डोळ्याच्या पडद्याला झालेल्या इजेमुळे थेट दृष्टीला धोका निर्माण झालेला असतो. त्याचे लवकर निदान करून त्यावर प्रभावी उपचाराचे तंत्र आहे. त्यामुळे रुग्णाची दृष्टी वाचवता येऊ शकते. मात्र, लॉकडाऊनमध्ये झालेल्या डोळ्याच्या इजेवर तातडीने उपचार न करता नियम शिथील होईपर्यंत वाट बघणारे रुग्ण आता उपचारांसाठी येत आहेत. त्यातील बहुतांश जणांच्या उपचाराची वेळ निघून गेली असल्याचे दिसून येतेय''
-    डॉ. आदित्य केळकर, नेत्रतज्ज्ञ, राष्ट्रीय नेत्रचिकीत्सा संस्था
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT