Chaya and Satish 
पुणे

बहीण-भावाचं लख्ख यश! मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचं केलं सोनं

दत्ता म्हसकर

जुन्नर - कौंटुंबिक परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गोळेगाव तालुका जुन्नर येथील भावा-बहिणीने आई व वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखविले आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सतिश विठ्ठल बेळे याची आसाम रायफल्स मध्ये तर बहीण छाया हिची केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये निवड झाली आहे. सतीश बारावी तर छाया बी.कॉम झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरी एकत्र कुटुंबातील फक्त अर्धा एकर शेती असल्याने वडील विठ्ठल मारुती बेळे यांनी हमालीकाम तर आई रेवडीबाई शेतात मोलमजुरी करत प्रपंचाचा गाडा ओढत आहेत. घरी वृद्ध आई,पत्नी व दोन मुले या सर्वांची जबाबदारी खांद्यावर असल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी तसेच मुलांचे शिक्षण आईचा औषधोपचार यासाठी वडील विठ्ठल जुन्नर येथे हमाली काम करतात.

स्वतःच्या तीन चाकी सायकलॉवरून व्यापाऱ्यांचा माल घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याचे काम विठ्ठल करतात. तर कुटुंबाचा खर्च भागविण्याची त्यांची धडपड पाहून पतीच्या खांद्याला खांदा लावत रेवडीबाई देखील शेतमजुरी करत आहेत. आपल्या भविष्यासाठी आईवडिलांची चाललेली धडपड पाहून दोघा बहीण भावाने शिकून मोठ होण्याच स्वप्न उराशी बाळगल होतं. ते आता साकार झाल्याची भावना आपल्या निवडीनंतर त्यांनी व्यक्त केली आहे.

सतीश व छाया यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.आसाम रायफल्स व सीआरसीएफच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत असणाऱ्या परीक्षा २०१६ पासून देण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये दिलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे दोघे बहीण भाऊ परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी झाले. 

दोघांच्या यशाबद्दल लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष कैलास लोखंडे,सचिव जितेंद्र बिडवई,जुन्नर बिल्डर्स असोसिएशनचे मुकेश ताजणे,अश्वमेघ मंचचे उपाध्यक्ष संदीप ताजणे तसेच गोळेगावचे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Chh. Sambhaji Nagar News : फुलंब्री निवडणुकीत जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव; शिवसेना उमेदवाराचा गंभीर आरोप!

Alandi Election : आळंदी नगरपरिषदेतील गटनेता, उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्य निवडीसाठी चर्चासत्र सुरु!

SCROLL FOR NEXT