Bhagat_Singh_Koshyari 
पुणे

'...म्हणून दिवसभर राज्यपालांचा फोन खणखणत राहिला'; काय आहे हे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शेतकरी, कष्टकरी आणि मोलमजुरी करणाऱ्यांच्या खात्यात 15 हजार रुपये जमा करण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्र सरकारला करावी. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना कोणती औषधे दिली? कोणते उपचार केले? हे जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे. कोरोनाच्या संकट काळात राज्यपालांनी नेमके जनतेसाठी काय काम केले याचा अहवाल प्रसिद्ध करावा, अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी (ता.२२) थेट राज्यपालांना फोन करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले.

राज्यभरातील हजारो नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेत राजभवनात फोन केले. त्यामुळे राजभवनातील सर्व फोन आज दिवसभर बिझी होते. लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे याबाबत राजभवनातील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती, अशी माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी दिली. किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या  कार्यकर्त्यांसह सांगली जिल्हा  संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, सातारा जिल्हा प्रहार संघटना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सोलापूर जिल्हा, जत तालुका वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ तसेच सोलापूर जिल्ह्यातील यलमार मंगेवाडी, वाकी घेरडी, वाटंबरे, हटकर मंगेवाडी आदी अनेक गावांनी या फोन आंदोलनात सहभाग घेतला होता.  

कोरोनाशी निगडीत जनतेच्या प्रश्नांबाबत झालेल्या एवढ्या मोठ्या आंदोलनाला राज्यपालांना उत्तरच देता येत नसल्याने आम्ही आता लवकरच राष्ट्रपती व पंतप्रधान कार्यालयात फोन आंदोलन करणार आहोत.
- प्रफुल्ल कदम, संस्थापक, किसान व वॉटर आर्मी

या आहेत मागण्या : 
- शेतकरी, कष्टकरी आणि मोलमजुरांना 15  रुपये मदत निधी मिळण्याची शिफारस राज्यपालांनी केंद्राला करावी.
- कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांना कोणते औषध व उपचार पद्धती जाहीर करावी.
-  राज्यपालांनी राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये कोरोना संशोधन व विस्ताराबाबत काय कृती आराखडा राबवला हे प्रसिद्ध करावे.

- कोरोना विरोधी मोहीम गतिमान व व्यापक होण्यासाठी केंद्रात व राज्यात "विरोधीपक्ष मदत व सल्लागार समिती" स्थापन करावी
- कोरोनाचे औषध व लसी संदर्भात राज्याचा सध्याचा व भवितव्याचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावा.
-  चारा छावण्यांच्या धर्तीवर संस्थाच्या माध्यमातून जागोजागी कोरोना मदत व क्वारंनटाईन केंद्रे सुरू करण्यात यावीत.
- कोरोना संकटकाळात राज्यपालांनी नेमकी कोणती कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडल्या तसेच जनतेला प्रत्यक्ष काय मदत केली याचा अहवाल प्रसिद्ध करावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files ओपन! सेक्स स्कँडलचे धक्कादायक 68 नवीन फोटो प्रसिद्ध... बिल गेट्ससह दिग्गज नेत्यांचे फोटो, जग हादरलं!

Viral Video: लेकीच्या जन्माचा जल्लोष! धुरंधरमधील 'FA9LA' गाण्यावर वडिलांचा भन्नाट डान्स, यामी गौतमने शेअर केली पोस्ट

Kolhapur Double Killed Hupari : धक्कादायक! हुपरीत काळजाला चटका लावणारी घटना; मुलानेच वृद्ध आई-वडिलांचा केला निर्घृण खून

Kolhapur Election : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी; नेत्यांपेक्षा मतदारांना वश करण्यासाठी स्पर्धा; कार्यकर्त्यांची ताकदच विजयाला पडते उपयोगी

Ahilyanagar Crime: रुईछत्तीशी येथे हॉटेलमधून बांगलादेशी तरुणी ताब्यात; मुंबई पोलिसांची अहिल्यानगरमध्ये कारवाई, धक्कादायक माहिती समाेर..

SCROLL FOR NEXT