conspiracy to shut down a charitable institution established for the Maratha community says Sambhaji Raje 
पुणे

मराठा समाजासाठी स्थापन झालेली सारथी संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र : संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठा समाजासाठी स्थापन झालेल्या 'सारथी'मधील काही कर्मचाऱ्यांना संस्थेत येण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आज संस्थेला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. 

संभाजी राजे हे संस्थेत आले. त्यांनी संस्थेवर टाकण्यात आलेल्या निर्बंधाबाबत चर्चा केली. ते म्हणाले, "सारथी संस्थेत जे घडतंय ते ऐकून मी बैचेन झालो. संस्था बंद पाडण्याचे षडयंत्र आहे. ते आम्ही होऊ देणार नाही काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात भेटलो त्यांना या विषया संदर्भात काहीही माहीत नव्हते."

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आगीची तीव्रता कमी, आगीचे कारण अस्पष्ट

"संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना लाभ व्हावा हे आहे. सचिव जे. पी. गुप्ता पत्रक काढतात आणि त्याची कल्पना मुख्यमंत्र्यांना ही नाही हे आश्चर्य आहे. जर गुप्ता दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी," अशी मागणी त्यांनी केली.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था या शासकीय कंपनीची स्वायत्तता धोक्यात आली आहे. या संस्थेचा निधी देखील रोखण्यात आला आहे. या निर्बंधामुळे संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनी राजीनामा दिला आहे. पण त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. त्यातच इतर मागासवर्ग विभागातील उपसंचालक विजया पवार यांच्याकडे वित्तीय आणि प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत.

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

संस्थेतील काही कर्मचारी आज तेथे गेल्यानंतर त्यांना कार्यालयात जाण्यास मज्जाव करण्यात आला. या कर्मचाऱ्यांनी 26, 27 डिसेंबर रोजी सुटी घेतली होती. त्यामुळे पवार यांनी त्यांचे नावे पत्र काढून परिहार यांच्या परवानगीशिवाय कार्यालयात येऊ नये, अशा सूचना दिल्या. हे कर्मचारी बाहेरच थांबून होते. परिहार यांना हा प्रकार समजल्यानंतर ते संस्थेत आले. त्यानंतर कर्मचारी संस्थेत दाखल झाले.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

विजया पवार यांनी सारथीचे प्रशासन हाती घेतल्यानंतर प्रभात पोलिस स्टेशनकडे या शासकीय कंपनीसाठी संरक्षण मागितले आहे. त्यासाठी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की माजी व्यवस्थापकीय संचालक परिहार यांनी काही कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे कंपनीचे महत्वाचे अभिलेख गहाळ होण्याची शक्यता असल्याने पोलिस संरक्षणाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT