Pune-Mall 
पुणे

मॉल्स, बाजारपेठेत वर्दळ कमीच; व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतिक्षा

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर शहरातील मॉलसह मुख्य बाजारपेठेत ग्राहकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी अद्याप खरेदीसाठी प्रतिसाद कमी आहे. पुढील काही दिवसात मार्केट व्यवस्थीत होईल अशी अपेक्षा व्यवसायिकांना आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विकेंड म्हणला की पुण्यातील बाजारपेठेत एकदम फलून गेलेली असते. तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, डेक्कन जिमखाना, कॅम्प या भागातील बाजारपेठेसह शहरातील सर्व मॉल्समध्ये गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे  सर्वच बाजारपेठेत बंद झाली, व्यवहार ठप्प झाले. लॉकडाऊन मधून अनलॉकच्या दिशेने जाताना टप्प्याने शिथिलता आणली जात आहे. 

पुण्यातील मॉल्स सुरू होऊन तीन दिवस झाले, शनिवार आणि रविवारी मोठ्या ग्राहकांची अपेक्षा व्यवसायिकांना आहे. मॉल मधील ७० टक्के दुकाने उघडली आहेत. पण कपडे ट्रायल करणे यासह काही गोष्टींवर अजूनही बंदी असल्याने खरेदीवर परिणाम होत आहे. याबाबत वेस्ट एंड मॉलचे केंद्र संचालक साशंक पाठक म्हणाले, "मॉल सुरू होऊन तीन दिवसच झाले आहेत, पण आज गर्दी थोडी वाढली आहे. मॉलचा ७० टक्के भाग खुला केला आहे. १५ ऑगस्ट पर्यंत मॉल ग्राहकांच्या गर्दी होऊन मोठ्याप्रमाणात व्यवहार होतील.'

तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता भागात दुकाने उघडी असली तरी ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही. आज पाऊस कमी असल्याने ग्राहकांची संख्या थोडीशी वाढली आहे. तसेच गणेशोत्सवासाठीची खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. तुळशीबागेतील व्यवसायीक सागर काळे म्हणाले, "जिल्हा बंदी मुळे आम्ही माल आणु शकलो नाहीत  तसेच कोरोनामुळे ग्राहकांची गर्दीही कमी आहे. केवळ १० टक्के व्यवसाय होत आहे.'

मयूर रेंडे म्हणाले, "आता गणेशोत्सव येत असला तरी अजून ग्राहक नाहीत. थोडा फार व्यवसाय होत आहे. ग्राहकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे."

"कोरोना'मुळे खरेदीसाठी इतके दिवस बाहेर पडलो नव्हतो, पण आता बहिणीचे लग्न असल्याने शाॅपींग सुरू केली. पण दुकानांमध्ये हवा तसा आमच्या पसंतीस येणाऱ्या वस्तू उपलब्ध होत नाहीत."
- अरुणा परदेशी, ग्राहक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matoshree Drone: मातोश्रीवरून ड्रोन उडवल्याचे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे खळबळजनक दावे, ५ प्रश्न करत संशय व्यक्त केला, म्हणाले...

Ranji Trophy, Video: ६,६,६,६,६,६,६,६.... सलग ८ षटकार अन् वेगवान अर्धशतक; २५ वर्षीय भारतीय फलंदाजाने घडवला इतिहास

Mumbai News: मुंबईकरांना दिलासा वाहतूक कोंडीतून मिळणार! MMRDA ७० किमीचा भूमिगत बोगदा बांधणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Mumbai News: ठाणे-नवी मुंबईत उभं राहणार नवं ‘बीकेसी’! १,३०० एकरवर भव्य व्यावसायिक केंद्राची घोषणा, पण कुठे उभारणार?

Diabetes Can Be Prevented: मधुमेह टाळता येऊ शकतो! पण तुम्हाला पाळावे लागतील 'हे' नियम

SCROLL FOR NEXT