kothrud1.jpg 
पुणे

पुणे : कोरोनाला रोखणारे कोथरुडकर; 45 दिवसांत फक्त पाच रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : संयमी, सुशिक्षित व सुसंस्कृत असणाऱ्या कोथरुडकरांनी कोरोनाला रोखून ठेवत ग्रीन झोनमध्ये आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. पुण्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोथरूडचे काय होणार याबद्दल अनेकांचे तर्क वितर्क सुरू होते. त्याला छेद देत कोथरूडमध्ये 45 दिवसाच्या कालावधीत कोरोनाग्रस्तांची संख्या पाचपर्यंत गेली. आता ती संख्या तीन आहे. यातील दोन रुग्णांची प्रकृती पाहता ही संख्या एकवर जाऊन लवकरच शून्यावर येईल, असा विश्वास कोथरुडकरांमध्ये आहे. 

परदेशातून कोथरूडमध्ये आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे 23 मार्चला समजले. त्यानंतर 26 एप्रिलला दुसरा रुग्ण आढळला. पोलिस, महापालिका कर्मचारी, सुजाण नागरिक आणि स्थानिक कार्यकर्ते यांनी घेतलेले अविश्रांत श्रम व सुसंवाद यामुळेच कोरोना बाधितांची संख्या पाचच्या पुढे जाऊ शकली नाही. कोथरूडच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या की, "आमच्याकडे 105 पोलिस आहेत. ते तीन शिफ्टमध्ये काम करणार म्हटल्यावर रात्रपाळीसाठी तीस व दिवसपाळीसाठी चाळीस असे कर्मचारी उपलब्ध होते. ही संख्या कमी असली तरी अनेक स्वयंसेवक मदतीसाठी पुढे आले. कोरोना बाबत सरकारी आदेश जारी होताच आम्ही प्रथम झोपडपट्टीला जोडणारे सर्व रस्ते बंद केले.''

झोपडपट्टीमधील नागरिकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घेतले. वस्तीत कोरोना शिरल्यास सगळ्यांचेच आरोग्य धोक्या त येईल याची जाणीव करून दिली. त्याचा परिणाम असा झाला की, वस्तीत बाहेरचा आला की लगेच आम्हाला समजत होते. नगरसेवक दीपक मानकर मित्र परिवारातर्फे गरजूंसाठी पाच हजार जेवणाची पाकिटे रोज वाटली जातात. म्हातोबानगर, मेगासिटी, जयभवानीनगर, किष्किंधानगर, केळेवाडी, हनुमाननगर, कानिफनाथ सोसायटी आदी भागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

याबाबत दीपक मानकर म्हणाले, "रेशनिंगसाठी लोक उन्हात थांबत होते. सोशल डिस्टन्सिंग राखणे अवघड होत होते. आम्ही हे दुकान भारती विद्यापीठ कन्या प्रशालेत आणले. त्यामुळे लोकांची पायपीट आणि उन्हाचा त्रास थांबला. परराज्यातील मजुरांची नोंदणी करून आरोग्य तपासणी करण्याचे काम सुरू आहे. थोडी चूक संपूर्ण वस्तीचे आरोग्य धोक्या त आणू शकते याचे भान असल्यामुळे लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे वस्तीमध्ये कोरोना पोचू शकला नाही.' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा


कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. अंजली टिळेकर म्हणाल्या, "कोथरूडमध्ये 1031 सार्वजनिक स्वच्छतागृहांची दिवसातून चार वेळा स्वच्छता सुरू आहे. सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांनी प्रभागानुसार सोसायट्यांचे व अधिकाऱ्यांचे व्हॉटसअप ग्रुप बनवले आहेत. नागरिक, पोलिस आणि महापालिकेचे कर्मचारी यांच्या सुसंवादातून प्रत्येकजण योग्य काळजी घेत आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Latest Marathi News Live Update : मुलुंड आणि भांडुप मधील मेट्रो चारच्या स्पेशल स्टील स्नॅप बसवण्याकरता पुढील दोन दिवस हा रस्ता मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत दोन दिवस बंद असणार

SCROLL FOR NEXT